मुंबई. दि. १६ : जालना येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ३ च्या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी १९२ कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे,अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. या परिसराच्या विकासाची कामे लवकरच सुरु करुन या परिसराचा सर्वांगिण विकास करु, असे पालकमंत्री श्री. लोणीकर यांनी सांगितले.
जालना येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ३ च्या कँम्पस क्षेत्रातील इमारती ह्या निजाम काळातील असल्याने त्या मोडकळीस आलेल्या आहेत. या सर्व परिसराची पालकमंत्री श्री. लोणीकर यांनी जानेवारी २०१५ मध्ये भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर जुन्या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्यासाठी तसेच या संपूर्ण क्षेत्राचा विकास करण्यासाठी पालकमंत्री श्री. लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर आता १९२ कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या विकास आराखड्यात प्रकार २ चे ५४०, प्रकार ३ चे १२,प्रकार ४ चे ६ आणि प्रकार १ चे १ अशी एकूण ५५७ निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. वर्ग ‘अ’ पासून वर्ग ‘ड’ पर्यंतच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी या आराखड्यात निवास स्थानासह, वाचनालय, व्यायामशाळा, प्राथमिक आरोग्यकेंद्र,समादेशक यांचे कार्यालय, कॉटर गार्ड, कंपनी कार्यालय, वायरलेस कार्यालय, मोटार वाहन कार्यशाळा, बहुउद्देशीय सभागृह व साईट कार्यालय या कामासाठी १७५ कोटी २३ लाखांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. हे काम ई निविदेप्रमाणे कुणाल स्ट्रक्चर इंडिया प्रा.लि. यांना देण्यात आले असून संबधित कंपनीला १५८ कोटी १४ लक्ष रुपयांचे स्वीकृती पत्र देण्यात आलेले आहे. आता लवकरच या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. बबनराव लोणीकर यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




