👁 14 Views

भारत-पाक अंतिम सामना पाहत आहेत तब्बल 32 कोटी प्रेक्षक

ओव्हल, दि. 18 – भारत-पाकिस्तानच्या आजच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याला सुरवात झाली आहे. पाकिस्तानने समाधानकारक सुरवात केली आहे. या दोन प्रतिस्पर्धी देशांमधला अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांचीही लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे.
भारत-पाक अंतिम सामन्याचा हा मुकाबला ओव्हल ग्राऊंडवर जाऊन पाहणा-या प्रेक्षकांशिवाय इतरही क्रिक्‍टप्रेमी टीव्हीच्या माध्यमातून हा सामना पाहतील. आज पूर्ण जगभरात जवळपास 32 कोटी 40 लाख प्रेक्षक आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सामना पाहतील, असा अंदाज आयसीसीने (इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल) वर्तवला आहे. जर असे झाल्यास हा क्रिकेट इतिहासातला सर्वात जास्त पाहण्यात आलेला महामुकाबला ठरेल. 2011मधला वर्ल्ड कप अंतिम सामना सर्वाधिक पाहण्यात आला होता. तो सामना जवळपास 55 कोटी 80 लाख लोकांनी पाहिला होता. त्याच वेळी दुस-या स्थानावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळण्यात आलेला वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीचा सामना होता. तो सामना 49 कोटी 50 लाख प्रेक्षकांनी पाहिला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *