👁 10 Views

माझी जिवाची आवडी…….पंढरपुरा नेईन गुढी……….

माझी जिवाची आवडी…….
                पंढरपुरा नेईन गुढी……….

                
कोणतेही आमंत्रण नाही, निमंत्रण नाही. बोलावा नाही की, सांगावा नाही. दरवर्षी ठरलेल्या तिथीला पालखीचे प्रस्थान देहू, आळंदी येथून होते. पायी तीर्थ यात्रा घडो या अभंगाप्रमाणे उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मैल वारकरी-भाविक आपल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी अतुरतेने पंढरपुराकडे धाव घेत असतो. वारकरी-भाविकांना पालखी मार्ग, पालखी मुक्काम आणि पंढरपुरात पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देता याव्यात यासाठी राज्य शासन आणि प्रशासनाने वश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याबाबत…
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वाऱ्या भरतात. आषाढी वारीचा सोहळा मोठाअसतो.  देहू,आळंदीसह अन्य ठिकाणांहून पालख्यांचे आगमन पंढरपुरात होत असते. दिवसें-दिवस वारीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. या भाविकांना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यास प्राधान्य दिले. यानुसार  प्रशासनाने जोमाने काम करुन वारकऱ्यांना सुविधा देण्यात गती घेतली.
            यंदाच्या आषाढी वारीला तर वारीपूर्वी सर्व कामे व्हावीत, वारकऱ्यांची सेवा करता यावी यासाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेतला.  पंढरपुरात येणाऱ्या वारकरी-भाविकांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही याकडे लक्ष दिल्यानेच 65 एकर, पालखी मार्ग, पालखी मुक्काम, पंढरपूर शहातील अतिक्रणे, वाळवंटामध्ये कामे गतीने झालेली दिसून येतात.
            जिल्ह्यातील पालखी मुक्काम तळ व पंढरपूर शहरात एकूण 21 आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे  (Emergency Operation Center) उभारली आहेत. यामधील  पंढरात 65 एकर, वाळवंट, पत्राशेड, दर्शन मंडप, नगरपालिका जिजामाता उद्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ही केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहे. आपत्ती प्रतिसादर व मदत केंद्र 24X7 तास सुरु राहणार असून यामध्ये आवश्यक असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये टेलीफोन सुविधा, टोल फ्री क्रमांक, वायरलेस, इंटरनेट व अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक केंद्रामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
            65 एकरामध्ये वारकऱ्यांना राहण्याची सोय करण्यात आली असून त्यांना पुरेशी शौचालये,आरोग्य, पोलीस संरक्षण आणि 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  वाळवंटामध्ये पुरेशी शौचालये ठेवण्यात येऊन स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.
            दर्शन मंडपामध्ये वारकरी भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, मोफत चहा, अतिदक्षता विभाग, रुग्ण वाहिका, आत्पकालीन व्यवस्था यंत्रणा, सी. सी. टी.व्ही यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे.  तर प्रथमच आधुनिक यंत्राद्वारे मंदीर व मंदीर परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे.  पत्राशेड, दर्शन रांगेत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
            वारीच्या कालावधीत बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, विशेष पथक नेमण्यात आले असून  महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचे विशेष पथक, गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी  सी.सी.टीव्ही व आवश्यक ठिकाणी प्रखर प्रकाशाची सोय केली जात आहे.  यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी  एक पोलीस अधिक्षक, सात अप्पर पोलीस अधिक्षक, 14 पोलीस उपअधिक्षक, 59 पोलीस निरिक्षक, 203 पोलीस उपनिरिक्षक, 27 महिला पोलीस उपनिरिक्षक, 3 हजार 215 पोलीस कर्मचारी, 555 महिला पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे 50 कर्मचारी तसेच वाहतूक शाखेसाठी 3 पोलीस उप-अधिक्षक, 10 पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उप-निरिक्षक, 420 पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. याचबरोबर एसआरपीएफ च्या 3 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. एक हजार 400 पुरुष होमगार्ड तर 200 महिला होम गार्ड नेमण्यात आले आहेत.  वारी कालावधीत नेमलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या निवासाची  सोय तसेच आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
            पंढरपूर नगरपालिकेमार्फत वारी कालावधीत आवश्यक तात्पुरती शौचालयांची उभारणी केली जात आहे. तर साफसफाईसाठी पुरेसा कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. वारीपूर्वी व वारीनंतर शहरात कचरा राहणार नाही याची दक्षता नगरपालिकेमार्फत घेण्यात आली आहे.
            आषाढी वारीमध्ये आरोग्य सेवेस प्राधान्य देण्यात आले असून यासाठी शासनाचा आरोग्य विभाग आणि  जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यंदा प्रथमच वारीमध्ये आरोग्य दूतामार्फत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. पालखी मार्गापासूनच यासाठी आरोग्य दूत नेमण्यात आले आहेत.  आषाढी यात्रा कालावधीत वारकरी व भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असल्याने   धर्मादाय आयुक्त विभागाने धर्मादाय रुग्णालय देखरेख समिती व जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने येथील चंद्रभागा बसस्थानक येथे दिनांक 27 जून ते 5 जुलै 2017 या कालावधीत आरोग्य सुविधा देण्यासाठी शिबीर रुग्णालय आणि फिरत्या रुग्णालय व्हॅन तैनात ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत वारी कालावधीत पंढरपूर शहर, पालखी मार्ग व पालखी मुक्कामाच्या ठिकाणचे भारनियमन रद्द करण्याचे नियोजन केले आहे.वारकऱ्यांसाठी नियमानुसार तात्पुरते वीज कनेक्शन देण्यात येत आहे. तर बीएसएनएल मार्फत यात्रा कालावधीत मोबाईल कॉल करण्याची क्षमता वाढविण्यात भर दिला आहे. आवश्क रिचार्ज कुपनचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या प्रवासाठी महाराष्ट्र एस.टी. महामंडळामार्फत सुमारे 3500 बसेसचे नियोजन करण्यात येऊन मुख्य बसस्थानकाव्यतीरिक्त पर्यायी बस स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊती व जगद्गगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखींचे आगमन सोलापूर झाले आहे. आषाढी वारी सोहळा जुलै रोजी होत आहे. या सोहळ्याची तयारी आणि वारकरी भाविकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात प्रशासन दक्ष आहे.
 – एकनाथ पोवार,
माहिती सहायक, पंढरपूर.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *