२१) डोळे बंद करून पापण्या खाली खेचाव्या व भुवया वर खेचाव्यात हात न लावता, या स्थितीत ५ ते १० सेकंद थांबावे. नंतर पूर्वस्थिती येऊन पुनः हीच क्रिया करावी.
२२) हाताची मधली बोटे गालावर नाकाच्या बाजूला दाबून धरावी दोन्हीबाजूस दोन्ही हाताने बोटाचा दाब खालील दिशेने असावा म्हणजे गाल खाली ओढल्या सारखे करून गालातुन हसण्याची क्रिया करावी.
त्यावेळेस डोके मागे घ्यावे. यामुळे गालाच्या आकार सुधारतो. सुरकुत्या कमी होतात.

२३) डोके वर धताकडे करावे दोन्ही ओठ बंद ठेवावे, खा;चा ओठ वरच्या ओठावर जास्तीत जास्त सरकवावा त्या स्थितीत १० सेकंद थांबावे. नंतर पूर्वस्थतीत यावे. हि क्रिया १० वेळा करावी.
२४) डोके वर करावे दोन्ही ओठ मिटलेले ठेवावे. दोन्ही ओठ गोल करावे शिटी वाजवताना करतात तसे. गोल केलेले ओठ छताकडे ताणून धरावे ५ ते १० सेकंद करावे पूर्व स्थितीत यावे. ५ ते १० आवर्तने करावी. यामुळे हनुवटीखालील व्हर्बि कमी होते. तसेच गळ्यावरील सुरकुत्या कमी होतात. थॉयराडचे कार्य सुधारते.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R









