पंढरपूर दि. 11 :-
पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी अंतर्गत चंद्रभागेच्या तीरावर हजारो हात स्वच्छता करणेसाठी सरसावले. महास्वच्छता अभियानात आज सुमारे १२ हजार लोकांनी उस्फुर्तपणे आपला सहभागी नोंदविला तर स्वच्छता अभियानात सुमारे 60 टन कचरा वेगवेगळ्या ठिकाणी संकलित करण्यात आला.
आषाढीवारी नंतर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमार्फत पंढरपुर येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. महास्वच्छता अभिायानाचा शुभारंभ संत नामदेव समाधी येथे व चंद्रभागा वाळवंटात भक्त पुंडलिक मंदिराजवळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे सभापती शिला शिवशरण, सभापती दिनकर नाईकनवरे, प्राचार्य बी. पी. रोंगे, जि. प. सदस्य उमेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरी, अविनाश गोडसे उपस्थित होते.
महास्वच्छता अभियानास सकाळी सुरूवात झाली. यामध्ये शहरातील विद्यार्थी, युवक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले. जिल्हा परिषदेचे ६१९५, वन विभाग ३००, महसुल व नगर पालिका ४९५०, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी ३००, पंढरपूर नगरपालिका ३००,स्वयंसेवक ४५० हजार अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख, शाखा अभियंता, आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, बांधकाम व कृषी व पशुसंवर्धन विभागाची अधिकारी व कर्मचारी यांचेसह अंगणवाडी सेविका, सुपरवायझर आदी उपस्थित होते.
लोकांचे सहभागाशिवाय स्वच्छता शक्य नाही. या पुढील काळात यात्रे पुर्वी व यात्रेनंतर देखील महास्वच्छता अभियान राबविण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वेळी सांगितले.
महास्वच्छता अभियानामुळे सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळते. या स्वच्छता अभियानात कर्मचाऱ्यांचा उत्साह दिसून आला ही कौतुकाची बाब असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी व्यक्त केले.
पंढरपुरात स्वच्छतेच्या माध्यमातून विठुरायाची सेवा करण्याची संधी मिळाली. स्वच्छता अभियानात प्रत्येकाने दिलेले योगदान महत्वाचे आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले.
· 60 टन कचरा वेगवेगळ्या ठिकाणी संकलित
· चंद्रभागा वाळवंट व मंदिर समिती, ६५ एकर परिसर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथे स्वच्छता
· जिल्ह्यातील नगर पालिकांचे सफाई कर्मचारी व 34 वाहनांचा सहभाग
· सकाळी ७ ते ११.३० वाजे पर्यंत स्वच्छता मोहीम
· महा स्वच्छता अभियानात सुमारे १२ हजार लोकांचा सहभाग
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा













