अहमदनगर/पुणे/जळगाव/नाशिक –राज्याला हादरवणाऱ्या व मराठा समाजाला संघटित करणाऱ्या कोपर्डी प्रकरणाला गुरुवारी एक वर्ष झाले. निर्भयाच्या स्मृतिदिनी राज्यभरातून लोकांनी कोपर्डीत येऊन श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पीडितेचा प्रतिकात्मक पुतळा बुधवारी मध्यरात्री नाशिकहून हलविण्यात आल्याची बातमी अगोदर आली. मात्र, गुरुवारी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर गावातील गर्दी ओसरताच रात्री साडेदहाच्या सुमारास कुटुंबीय व काही ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पुतळा नियोजित ठिकाणी बसवण्यात आला.
पीडितेच्या पुतळ्याच्या वादावर तिची आई म्हणाली, ‘गेले वर्षभर आम्हाला सर्वांनी मदत केली, परंतु भय्यू महाराजांनी सर्वतोपरी मदत केली. मात्र, काही लोकांनी विरोध केला म्हणून आज आमच्या मुलीच्या वर्षश्राद्धाला ते येऊ शकले नाहीत. माझे लोकांना एवढेच सांगणे आहे, राजकारण करू नका. तिचा जीव गेल्यावर, काही लोकच आम्हाला म्हणत होते, तिच्या नावाने काहीतरी उभे करा, त्यानुसार हे समाधीस्थळ उभारले जात आहे. त्यावरही राजकारण झाल्याचं
दु:ख वाटतंय.’
पीडितेची आई..
लोकच म्हणत होते मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ नावाने काहीतरी उभे करा. त्यानुसार आम्ही हे समाधिस्थळ उभारत होतो, त्यावरही राजकारण झालं याचं दु:ख वाटतंय.’
– पीडितेची आई, कोपर्डी येथे निर्भयाच्या पहिल्या स्मृतिदिनी बोलताना
– पीडितेची आई, कोपर्डी येथे निर्भयाच्या पहिल्या स्मृतिदिनी बोलताना
निर्भयाला श्रद्धांजली; मुंबईत मूकमाेर्चा काढण्याचा निर्धार
कर्जत –पीडित युवतीच्या हत्येच्या स्मृतिदिनी गुरुवारी काेपर्डीत (जि. नगर) राज्यभरातील नागरिक व मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्भयाला अादरांजली वाहिली. तसेच या घटनेच्या निमित्ताने राज्यभर मराठा क्रांती मूकमाेर्चे निघूनही राज्य सरकारने अद्याप समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे नऊ अाॅगस्ट राेजी मुंबईत भव्य माेर्चा काढून मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडू, असा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत गुरुवारी व्यक्त करण्यात आला.
पीडित मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी व सकल मराठा समाजातर्फे मुंबईतील राज्य मराठा क्रांती मोर्चाचा आढावा मेळावा कोपर्डीत झाला. या वेळी राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित हाेते. सुरुवातीस ‘निर्भया’ला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर भैरवनाथ मंदिराच्या सभागृहामध्ये मेळावा घेण्यात अाला. त्यात अनेक तरुणींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तर, काहींनी कोपर्डी येथे होणाऱ्या स्मारकाबद्दल आक्षेप नोंदवला. या अमानुष घटनेनंतर पुन्हा कोपर्डी येथील १७ लोकांवर आरोपींच्या नातेवाइकांनी ‘अॅट्रॉसिटी’ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यांना औरंगाबाद खंडपीठातून जामीन मिळवून देण्याचे काम केल्याबद्दल कर्जतचे सुपुत्र अॅड. नितीन गवारे व अॅड विश्वास गळगटे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी मुंबई येथे होणारा मोर्चा मूक मोर्चा असेल की ठोक मोर्चा असेल, असा सवाल केला. त्यामुळे बैठकीत अशांतता निर्माण झाल्यानंतर कोपर्डी ग्रामस्थांच्या वतीने झुंबर सुद्रिक यांनी, मुंबईतही मूक मोर्चा काढून आपली ताकद दाखविण्याचे ठरले आहे त्यामुळे या विषयाला कोणीही वेगळे वळण देऊ नये, असे अावाहन केले. छावा संघटनेचे आबा पाटील यांनी ‘आपण सर्वजण कोणत्या पद्धतीने चर्चा करत आहोत हे चित्र मीडियाच्या माध्यमातून बाहेर गेले तर मोठ्या परिश्रमातून उभी राहिलेली एकजूट पुन्हा होणार नाही व समाज आपल्याला माफ करणार नाही’, असे मत व्यक्त केले. अाैरंगाबादचे मनोज गायके, फलटणचे ज्ञानेश्वर सावंत, संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे, संतोष राव, विविध कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली.
अॅट्रॅासिटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
मुंबईच्या मोर्चात अॅट्रॅासिटीचा चा मुद्दा घ्यायचा की नाही, या बाबत विचारविनिमय झाला. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने उपस्थित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मुंबईच्या मोर्चात अॅट्रॅासिटीचा चा मुद्दा घ्यायचा की नाही, या बाबत विचारविनिमय झाला. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने उपस्थित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पीडितेच्या स्मारकावरून राजकारण नको- सुप्रिया सुळे
कोपर्डीतील घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी नराधमांना शिक्षा मिळाली नाही. हे सरकार अपयश आहे. पीडितेचे स्मारकावरून आता राजकारण केले जात आहे. ही बाब अत्यंत दुदैवी आहे. यामागील पीडितेच्या कुटुंबीयांची भावना समजून घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
कोपर्डी घटनेतील आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात मूक मोर्चा काढण्यात आला आहे. पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. तोंडाला काळया पट्ट्या बांधून मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, राज्यात मागील तीन वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्या, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

भय्यू महाराजांच्या पुतळ्याचे दहन
कर्जत –काेपर्डी येथे पीडित युवतीचे स्मारक उभारण्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने विराेध केला जात अाहे. हे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या भय्यू महाराजांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कर्जतमधील शिवाजी महाराज चौकात गुरूवारी दहन केले. यानंतर संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे व त्यांचे कार्यकर्ते कोपर्डीकडे जाण्यास निघाले असता पाेलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात अाली.
दरम्यान, पीडितेचे कुटुंब दु:खातून सावरत आहे. तिला न्याय मिळण्यास विलंब होत आहे. मुलीच्या नावाने शाळा, महाविद्यालय यासारखे उपक्रम सुरु करावेत. आमचा स्मारकाला विरोध आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत विचारले असता घरच्यांनी तिची समाधी उभारली असल्याचे सांगितले. अशा गोष्टीवरून कोणीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हा श्रेय घेण्याचा विषय नाही,’ असे अावाहनछावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी केले अाहे.
विराेध वाढल्याने कार्यक्रमास गैरहजर सूर्योदय परिवारातर्फे कोपर्डी येथील निर्भयाच्या घरासमोर सुरू असलेल्या स्मारकावर निर्भयाची मूर्ती बसवण्यात येणार होती. भय्यू महाराज यांचे प्रबोधनही होणार होते. मात्र, बुधवारी स्मृतीदिनाच्या कार्यक्रमास ते येऊ शकले नाहीत. स्मारक उभारणीस विराेध वाढत असल्यामुळे त्यांनी कार्यक्रमास येण्याची टाळले अशी कार्यक्रमस्थळी चर्चा हाेती. दरम्यान, ‘आमच्या मुलीची आठवण म्हणून आम्ही समाधी उभारली आहे. हे स्मृतिस्थळ आहे, स्मारक नाही. त्यामुळे या समाधीस्थळास कोणीही विरोध करू नये, अशी प्रतिक्रिया ‘निर्भया’च्या वडिलांनी व्यक्त केली.
चिमुकलीवर नराधमांकडून पाशवी बलात्कार…
कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

राज्यभरात मराठा मूक मोर्चे
कोपर्डी घटनेच्या संतापाची लाट राज्यभर पसरली. या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात मराठा क्रांती मूकमोर्चे निघाले. औरंगाबादेत 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला होता. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते.

कोपर्डी घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. १ वर्ष पूर्ण होऊन देखील या प्रकरणात न्याय मिळाला नाही. निर्भयाला नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मूक श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांना या प्रकरणात तातडीने न्याय मिळावा या मागणीचे निवेदन देखील देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा…
कोपर्टीतील बलात्कार आणि हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नाशिकमधील राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूकमोर्चा काढण्यात आला.

कोपर्टीतील बलात्कार आणि हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नाशिकमधील राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूकमोर्चा काढण्यात आला..

औरंगाबाद: राष्ट्रवादीच्या ‘मूक मोर्चा’कडे कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ…
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, तरीही पीडितेला अजून न्याय मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून औरंगाबादेत मूकमोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चाकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मोजक्याच कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.

अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111