👁 12 Views

अखेर त्यांनी मृतदेह आणला जिल्हा मुख्यालयात…..

Pandharpur Live 19 julay 2017

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, या कवितेच्या ओळी सुद्धा खोट्या ठरवीत वणी येथे एक भीषण वास्तव्य उघडकीस आले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात असलेल्या वणी या गावातील गावकऱ्यांची मरणानंतर सुद्धा सुटका नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. या गावात मृत व्यक्तीला स्मशान भूमीत जाण्यास रस्ता नसल्याने अखेरीस संतप्त गावकरी प्रहारच्या नेतृत्वात थेट प्रतिकात्मक मृतदेहासह जिल्हा परिषद मुख्यालयात पोहचले. प्रतिकात्मक मृतदेह घेऊन जिल्हा

 परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या कक्षात मृतदेहासह ठिया मांडण्यात आला. अखेर उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची मागणी तात्काळ मंजूर करून गावातील स्मशानभूमीचा रस्ता त्वरित बनवण्याची लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रहार कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  

































Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *