👁 11 Views

मुंबई विद्यापीठातील परिषदेसाठी शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन

मुंबईदि. 20 : भारतीय राज्य घटनेतील 73 व 74 व्या दुरूस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात होणाऱ्या दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेसाठी 15 ऑगस्ट 2017 पर्यंत शोधनिबंध पाठवावेतअसे आवाहन मुंबई विद्यापीठ आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने व राज्य शासनाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग आणि गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठात 14 ते 16 सप्टेंबर 2017 या कालावधीत ही दोन दिवशीय परिषद होईल. परिषदेचा मुख्य विषय 73 आणि 74 व्या घटना दुरूस्तीची 25 वर्षे: प्रगती आणि पुढील वाटचाल’ असा आहे. त्या अनुषंगाने भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमणभारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात प्रश्नमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वैशिष्ट्ये,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचा सहभागप्रसारमाध्यमे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इत्यादी विषयांवर संशोधक आपले शोधनिबंध पाठवू शकतात. शोधनिबंध 8 हजार शब्दांपेक्षा जास्त मोठा नसावा. अधिक माहितीwww.localdemocracy2017.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेअसेही प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  



























Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *