👁 7 Views

…तर काश्मिरमध्ये तिरंगा फडकणार नाही; महबूबा म्हणाल्या – माझ्यासाठी ‘इंडिया इज इंदिरा..!’

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017


…तर काश्मिरमध्ये तिरंगा फडकणार नाही; महबूबा म्हणाल्या – माझ्यासाठी ‘इंडिया इज इंदिरा..!’

काही लोकांना आवडणारन नाही,पण माझ्यासाठी इंडिया इज इंदिरा-मुफ्ती
श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी आपल्यासाठी इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असल्याचे विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काही लोकांना हे आवडणार नाही, पण त्या इंडिया होत्या. मी जेव्हा मोठे होत होते, त्यावेळी त्या भारताचे नेतृत्व करत होत्या. एवढेच नव्हे, तर आर्टिकल 35 (अ) संपुष्टात आणून 370 हटवण्याचा प्रयत्न केल्यास काश्मिरात तिरंगा फडणार नाही, असा इशारा सुद्धा महबूबा यांनी दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2014 मध्ये कलम 370 हटवण्याच्या मागणीसह एका एनजीओने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ती याचिका सुनावणीसाठी त्रिसदस्यीय खंडपीठाकडे पाठवण्यात आली आहे.
काय म्हणाल्या सीएम महबूबा..?
– शुक्रवारी एका कार्यक्रमात महबूबा मुफ्ती म्हणाल्या, ”एकीकडे आपण काश्मिरचा मुद्दा कायदेशीर मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि दुसरीकडे, त्यावर चाबूकने वार करत आहोत. आर्टिकल 35A ला आव्हान कोण आणि कशासाठी देत आहे? मी तर म्हणते, माझे (PDP) आणि इतर पक्ष (नॅशनल काँफ्रेन्स) काश्मिरात जीव मुठीत धरून तिरंगा पकडत आहोत. मात्र, काश्मिरच्या विशेषाधिकाराला हात लावल्यास येथे कुणीही तिरंगा हातात घेणारा शिल्लक राहणार नाही, यात काहीच शंका नाही.”
– ”आणखी एक स्पष्ट करू इच्छिते, आर्टिकल 35A आणि 370 ला आव्हान देऊन आपण फुटिरतावाद्यांना लक्ष्य करू शकणार नाही. त्यांचा एजंडा वेगळा, केवळ फुटण्याचा आहे. असे करून आपण भारतीय आणि स्वतःला देशभक्त मानणाऱ्यांना कमकुवत करत आहात. काश्मिरातील भारतीय निवडणुकीत सहभागी होतात. शांतता आणि सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याची अकांक्षा ठेवतात. तरीही मध्येच विशेषाधिकार आणि झेंड्याचा मुद्दा उपस्थित केला जातो.”
काश्मिरींना देशद्रोही ठरवण्यातच मशगूल…
– सीएम पुढे म्हणाल्या, ”काश्मिर भारताचाच एक विचार आहे. आता या विचाराची मर्यादा काय हाच नेमका वादाचा मुद्दा आहे. काश्मिरला राज्यघटनेने विशेषाधिकार दिले आहेत. काहीही वाईट घडल्यास सगळीकडून लोक एकमेकांना अप्रामाणिक ठरवायला निघतात.”
– “दोन्हीकडून (केंद्र आणि राज्य) होणाऱ्याव वादात काश्मिर 70 वर्षांपासून संकट आणि समस्यांना सामोरे जात आहे. त्या समस्या सोडवण्यापेक्षा लोक कटकारस्थान करून काश्मिरींना देशद्रोही ठरवण्यात आणि वेळोवेळी सत्ता बदलण्यातच मशगूल आहेत. फुटिरतावाद्यांचे प्रकरण सोडवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने सैनिक आणि दारुगोळा राज्यात पाठवत आहात. केवळ अशाने समस्या सुटणार नाही.”

…तर काश्मिरात कुणीही तिरंगा फडकावणार नाही असा इशारा सीएम महबूबा मुफ्ती यांनी दिला. (फाईल)







पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *