👁 7 Views

मुंबई येथील सकल मराठा समाजाच्या क्रांतीमुक मोर्चाला पंढरपूर तालुक्यातून लाखो मराठा समाज हजेरी लावणार..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 28 July 2017

Pandharpur Live



मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या सकल मराठा समाजाच्या क्रांती मुक मोर्चाला पंढरपूर तालुक्यातील मराठा समाज लाखोंच्या संख्येने हजेरी लावणार असल्याचा निर्धार आज पंढरपूर शहरात झालेल्या सकल मराठा समाजाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. 



येथील संत गाडगे महाराज मठामध्ये आज झालेल्या आढावा बैठकीत बोलताना सोलापूरचे माऊली पवार, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव व शहाजी पवार यांनी आपले विचार व्यक्त केले. या सर्वांनी सांगितले की, सदरचा मोर्चा हा महाराष्ट्र सरकारला अल्टीमेटम असून मराठा आरक्षण, अ‍ॅट्रासिटी  अ‍ॅक्ट, सरसकट शेतकरी कर्जमाफी या कळीच्या मुद्द्यावर सरकार आत्तापर्यंत महाराष्ट्रात झालेले 58 ठिकाणचे लाखो मराठा समाजाचे मुकमोर्चे  डोळ्याने बघूनही शांत आहे. समाजावरील झालेल्या अन्यायामुळे मराठा समाजमनाची खदखद शासनाच्या निदर्शनास आलेली असूनहीा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जाणीवपुर्वक झोपेचे सोंग घेत आहेत. मराठा समाजाला न्याय देण्याची भावना सध्याच्या सरकारची नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे येत्या 9 ऑगस्ट ला मुंबई येथे भायखळा ते आझाद मैदान असा विराट मराठा समाजाचा मोर्चा निघणार असून या मोर्चाला सकल मराठा समाजाच्या प्रत्येकाने तातडीने तयारी करुन हजर राहण्याची विनंती करण्यात आली. मराठा समाजाच्या मागण्या मुंबई येथील मोर्चानंतरही मान्य न झाल्यास पुढील काळात अतिशय तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्याची तयारीही सकल मराठा समाजाच्या वतीने करावी लागेल. 

मुंबई येथील मोर्चासाठी सर्वांनी आपापल्या परीने वाहन, जेवण, निवासाची व्यवस्था आदीचे नियोजन करुन शांततापुर्वक हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार एकमुखाने या बैठकीत घेण्यात आला. आजपर्यंत महाराष्ट्राच्या विविध शहरातून निघालेल्या मोर्चाहूनही खुप मोठा व भव्य मोर्चा मुंबई येथील असेल. या दिवशी अख्खी मुंबई थांबलेली  पहायला मिळेल. मराठा समाजाची एकी व शक्ती याचे अफाट व भव्य दर्शन मुंबईसह अवघा भारत देश या दिवशी पाहील. अशा पध्दतीचे नियोजन अवघ्या महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेले आहे. पंढरपूर शहरातूनही सकल मराठा समाजातील सर्व स्तरातील घटक या मोर्चाला लाखोंच्या संख्येने जाणार असल्याचे संकेत या बैठकीत मिळाले.

यावेळी सोलापूरचे दत्ता मुळे, रवि मोहिते, राजु पांढरे, शिवरत्न गायकवाड, पोकरकर सर तसेच  पंढरपूरचे नागेशकाका भोसले, संदीप मांडवे, दिलीप साबळे, जयवंत (आण्णा) माने, संदीप केंदळे, सौदागर मोळक,बंडु अटकळे, रामभाऊ गायकवाड, समाधान काळे, सुधाकर कवडे, राहुल साबळे, बालाजी मलपे, श्रीकांत बागल, तानाजी बागल, किरण घाडगे, स्वागत कदम, शंकर सुरवसे, संदीप मुटकुळे, बाळासाहेब बागल, शेखर अटकळे, किरण अटकळे, शेखर भोसले, बंटी भोसले, प्रशांत शिंदे, सतीशअप्पा शिंदे, सतीश गांडुळे, मुन्ना मलपे, विशाल मलपे, धनराज मोरे, दिलीप भोसले, सुनील पाटील, अर्जुन चव्हाण, संदीप पाटील, रवि बाबर, अमित देवकर, दत्ता काळे, गोपी वाडदेकर, एस.पी. गायकवाड, आण्णा लटके, विनोद लटके, भास्कर जगताप, अमीत पवार, रवि मुळे, सचिन पाटील, संजय कदम आकाश मांडवे, ओंकार फाटे, निलेश गंगथडे, बापु चौधरी, नवनाथ पोरे, सतीश बागल, भगवान वानखेडे, शंकर कदम, राजकुमार घाडगे, राधेश बादले-पाटील आदींसह बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.   






पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *