👁 8 Views

प्रधानमंत्री पीक विम्यासाठी रविवारीही बँका सुरू… शेतकऱ्यांच्या अर्जाचा ऑफलाईन स्वीकार करणार… काळजी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017


जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

प्रधानमंत्री पीक विम्यासाठी रविवारीही बँका सुरू…
शेतकऱ्यांच्या अर्जाचा ऑफलाईन स्वीकार करणार…
काळजी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. 29 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता उद्या (रविवार, दि. 30) राज्यातील बँका सुरू राहणार आहेत. याबरोबरच बँक कर्जदार शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून ऑफलाईन अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली आहे. या योजनेत सहभागापासून कणीही वंचित राहणार नाहीयाची दक्षता घेण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाहीअसेआवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2017 ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जनसुविधा केंद्र तसेच बँकांमध्ये शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याची दखल घेऊन रविवारी सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण व निम शहरी भागातील बँका सुरू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. ज्या बँकांची सोमवारी साप्ताहिक सुटी असते त्यांनी देखील सोमवारी कामकाज चालू ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेने कळविले आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना ई-केवायसीमुळे फॉर्म भरण्यास विलंब लागतो त्यातच काही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या जाणवल्याने ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला मंजुरी देत बँकांमध्ये ई-केवायसीची माहिती घेऊन अर्ज ऑफलाईन जमा करण्यात येत आहेत. या सुविधेमुळे बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होणार असून शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारले जाणार आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागापासून कोणीही वंचित राहणार नाही. याची दक्षता राज्य शासनामार्फत घेण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी काळजी करु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
००००

वृ. वि. 6249                                                                             6 श्रावण, 1939 (दु. 4.30 वा.)
 दि.29 जुलै, 2017
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतली
 राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट

मुंबईदि. २९ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. मुंबई विद्यापीठाचे निकाल आणि परीक्षांच्या पेपर तपासणी संदर्भात श्री. तावडे आणि राज्यपाल यांच्यामध्ये सुमारे अर्धातास सविस्तर चर्चा झाली.
 विधीमंडळामधील दोन्ही सभागृहातील सदस्यांनी विद्यापीठाच्या निकालासंदर्भात ज्या भावना व्यक्त केल्या होत्यात्या श्री. तावडे यांनी राज्यपालांच्या कानावर घातल्या. सध्या सुरु असलेल्या पेपर तपासणीच्या सद्यस्थितीची माहिती श्री. तावडे यांनी राज्यपालांना दिली. विद्यापीठांच्या परीक्षांच्या सर्व उत्तरपत्रिका दिलेल्या मुदतीत तपासून होतील आणि बहुतांश परीक्षांचे निकाल ३१ जुलैपर्यंत लागतीलअसेही श्री. तावडे यांनी सांगितले.
000
वृ. वि. 6250                                                                 6 श्रावण, 1939 (दु. 4.30 वा.)
  दि.29 जुलै, 2017
आयटीआयच्या परीक्षा आता ऑनलाईनजानेवारीपासून अंमलबजावणी
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २९: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यापुढे जात आता आयटीआयच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सध्या याबाबतची तयारी सुरु असून जानेवारी २०१८ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर,राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटीलकौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सचिव असिम गुप्ताकौशल्य विकास आयुक्त ई. रवींद्रन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकेंद्र शासनाच्या शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मध्येसुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त ॲप्रेन्टीसशिप मिळवून देण्यात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ॲप्रेन्टीस ॲक्टमधील सुधारणेमुळे राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगार आणि स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
कौशल्य विकास कार्यक्रमात धोरणात्मक सुधारणेअंतर्गत राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेला स्वायत्ता प्रदान करण्यात आली आहे. कौशल्य विकास संस्थाचे नोंदणीकरण१५ ते ४
 वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षणशेतकऱ्यांसाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रातील व्यवसाय प्रशिक्षणासाठी विविध योजनाअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळादवारे आर्थिकदृष्टया मागास घटकांना मदत,तांत्रिक प्रशिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या व्याप्तीत वाढ अशा विविध विषयात कौशल्य विकास विभागाने आघाडी घेतली असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील आयटीआय आधुनिकीकरणाचे केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कौतुक
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या पुढाकारातून राज्यातील शासकीय आयटीआयचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आधुनिकीकरण होत असून ही निश्चित कौतुकाची बाब असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव प्रताप रुढी यांनी यावेळी सांगितले. राज्यातील कौशल्य विकास विभागाचे काम नियोजनबद्ध पध्दतीने सुरु असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन आयटीआयच्या गुणवत्तेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात कौशल्य विकास विभागाने स्वयं वर्गवारीसाठी  प्रयत्न करावेत असे सांगून लघू सत्र कौशल्य प्रशिक्षणही जिल्ह्यांमध्ये देण्यात यावे यासाठी केंद्रामार्फत सहकार्य करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास विभागामार्फत २०२२ पर्यंत महाराष्ट्रात सुमारे ४.५० कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. याअंतर्गत अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून दरवर्षी ३ लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहेअसे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,कौशल्य विकास विभागअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने केलेली प्रगती आणि भविष्यातील नियोजन याबाबतचे सादरीकरण केले.  याबरोबरच कौशल्य विकास विभागामार्फत परदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्लेसमेंट केंद्र स्थापन करणे,आगामी काळात महिला उदयोजिका वाढविण्यासाठी काय करता येईल याबाबतही या बैठकीदरम्यान सादरीकरण करण्यात आले.
महास्वयम पोर्टलचे अनावरण

कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार,एमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्ही वेबपोर्टलचे एकत्रिकरण करुन महास्वयंम हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले असून या वेबपोर्टलचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री राजीव प्रताप रुढी यांच्या हस्ते आज करण्यात आले. महास्वयम पोर्टल वन स्टॉप शॉप म्हणून काम करणार आहे.
००००
वर्षा फडके२९ जुलै २०१७




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *