पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 31 July 2017
‘वंदे मातरम्’चा असा आहे इतिहास, स्वातंत्र्याची प्रेरणा ठरलेल्या या गीतावर आज होतोय वाद…
मुंबई – शुक्रवारी विधानसभेत पुन्हा एकदा ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून रणकंदन माजले. सभागृहात भाजप आमदार अनिल गोटे आणि सपा नेते अबू आझमी यांच्यात चांगली खडाजंगी झाली. विधान भवनाबाहेर एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि भाजप आमदार राज पुरोहित यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. भाजप आमदारांनी ‘देश मे रहेना है तो वंदे मातरम् कहना होगा’ असे म्हटल्याने वारिस पठाण संतप्त झाले. सभागृहात अबू आझमी यांनी शिवाजी महाराजांच्या फौजेपासून स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या इतिहासाचे दाखले दिले. देशासाठी बलिदान द्यायला अनेक मुस्लिम तयार असल्याचे ते म्हणाले. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर या गीताच्या जन्माविषयीची ही एेतिहासिक माहिती देत आहोत.
पुढे वाचा
मुंबई – शुक्रवारी विधानसभेत पुन्हा एकदा ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून रणकंदन माजले. सभागृहात भाजप आमदार अनिल गोटे आणि सपा नेते अबू आझमी यांच्यात चांगली खडाजंगी झाली. विधान भवनाबाहेर एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि भाजप आमदार राज पुरोहित यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. भाजप आमदारांनी ‘देश मे रहेना है तो वंदे मातरम् कहना होगा’ असे म्हटल्याने वारिस पठाण संतप्त झाले. सभागृहात अबू आझमी यांनी शिवाजी महाराजांच्या फौजेपासून स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या इतिहासाचे दाखले दिले. देशासाठी बलिदान द्यायला अनेक मुस्लिम तयार असल्याचे ते म्हणाले. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर या गीताच्या जन्माविषयीची ही एेतिहासिक माहिती देत आहोत.स्वातंत्र्याचे स्फुलिंग चेतवणारे गीत
-प्रख्यात साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1882 मध्ये लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत हे गीत लिहिले होते. हे गीतच पुढे भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले. १८५७च्या सशस्त्र क्रांतीपासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात झाली. हा लढा यशस्वी झाला नसला तरी निरनिराळ्या रूपांत इंग्रजांना विरोध होऊ लागला. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब स्वातंत्र्य लढ्याचे केंद्रबिंदू बनले. 1870च्या दशकात एका वेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली. १८८५ म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या पूर्वीचा तो काळ होता. इंग्रजांचे जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली. अशा या वातावरणात वंदे मातरम् या गीताचा जन्म झाला.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












