👁 12 Views

श्री मन्मथ स्वामी महाराजांच्या पालखीची मिरवणूक उत्साहात..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..


मन्मथ स्वामी महाराजांच्या भव्य दिव्य पालखी मिरवणुकीत निलराज डोंबे, पांडुरंग गुळबिले, अध्यक्ष शिरीष पंतोजी, सुरेश पावले, सुरज पावले, सुभाष खटावकर, लल्लू महाराज, संजय खटावकर, मल्लिकार्जुन स्वामी, गुरुराज ठिगळे, संजय म्हमाणे आदी

पंढरपूर Live 8 August 2017

 पंढरपूर- दरवर्षी प्रमाणे वीरशैव लिंगायत समाज व श्री मन्मथ स्वामी मठ संस्था यांच्या तर्फे आयोजित केलेल्या सप्ताहाची सांगता मन्मथ स्वामी महाराजांच्या भव्य दिव्य पालखी मिरवणुकीने करण्यात आली .
        नवी पेठ मधील श्री मन्मथ स्वामी मठामध्ये श्रावण महिन्यामुळेआठवडाभर आयोजिलेल्या कार्यक्रमात पहाटेपासून ते रात्रीपर्यंत नित्य शिवपाठ, ग्रंथ पारायण, भजन कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. श्री मन्मथ महाराजांच्या मठापासून श्री श्री श्री १०८ माढेकर महाराजांच्या उपस्थितीत मन्मथ स्वामी महाराजांच्या पालखी व दिंडी सोहळ्यास सुरवात झाली पुढे अर्बन बँक, डोंबे गल्ली, जुनी पेठ, नाथ चौक, तांबडा मारुती, भजनदास चौक, कालिकादेवी चौक, काळा मारुती चौक, चौफाळा, भादुले चौक रोड मार्गे पुन्हा मन्मथ महाराज मठापर्यंत आली. वाजत गाजत ही मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघाली. मिरवणूक पाहण्यासाठी दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती तर पालखीवर फुलांचा वर्षाव होत होता. या मिरवणुकीमध्ये निलराज डोंबे, पांडुरंग गुळबिले, अध्यक्ष शिरीष पंतोजी, सुरेश पावले, सुरज पावले, सुभाष खटावकर,लल्लू महाराज, संजय खटावकर, मल्लिकार्जुन स्वामी, गुरुराज ठिगळे, विश्वेश्वर भिंगे, महेश खरडे, संजय म्हमाणे यांच्यासह वीरशैव लिंगायत समाजातील बहुसंख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *