पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 8 August 2017
पंढरपूर(प्रतिनिधी)जनहित संघटना व महिला आघाडीच्या वतीने पंढरपूर येथील उपकारागृहात बंदीस्त असलेल्या कैद्यांना राखी बांधून भाऊ-बहीणीच्या नात्याचा प्रचंड जिव्हाळा असलेला रक्षा बंधणाचा सण मोठया भावपुर्ण व आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी जनहीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर(भैय्या)देशमुख, ज्येष्ठ महिला समाजसेविका साधना राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश नवले.शहराध्यक्ष देवीदास चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष पुकाळे, संपर्क प्रमुख ज्ञानेस्वर भोसले, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सलीम बागवान आदी उपस्थित होते.
तहसिल कार्यालयाच्या आवारातील उपकारागृहाचे जेलर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, इंगळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. तर या उपक्रमास पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे व पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी विशेष सहकार्य केले.
जनहीत संघटनेच्या महीला आघाडीच्या अमृता नवले, आस्मा बागवान, संगीता नवले, सुवर्णा कवडे, शारदाताई शेळके, गायत्री चव्हाण या भगिनींनी कैदेतील 37 कैद्यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले.यावेळी अनेक कैदी भावविवश झालेले दिसून आले.आयुष्यात घडलेल्या गुन्ह्यामुळे कुटुंबापासून दूर रहावे लागत असल्याने अनेक कैदी आज रक्षाबंधणादिनी व्याकुळ झालेले दिसून आले होते.जनहीत संघटनेने पुढाकार घेवून हा उपक्रम राबवील्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी राजकुमार जाधव, अनिल भोसले, बालासाहेब आढेगावकर, अतुल डोके पाटील, बाळू शिंदे. लक्ष्मण शेटे, विनायक देवळे, संतोष सारणीकर, बाळासाहेब गोसावी, शाकीर शेख आदी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


