पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 9 August 2017
पंढरपूर- ‘स्पर्धेच्या युगात कोणतेही कार्य अडथळयावाचून पार पडत नाही आणि जो शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहतो त्याला हमखास यश मिळते . माझ्या यशाला सर्वप्रथम आई-वडिलांचे कष्ट व त्यांचे परिश्रम हेच आहेत त्यामुळेच आपण चिकाटीने व जिद्धीने परिश्रम केले. त्यामुळे आई व वडील हेच आपल्यासाठी खरी प्रेरणा आहे.’ असे प्रतिपादन मुंढेवाडी (ता. पंढरपूर) मधील आसिफ मुजावर यांनी व्यक्त केले.
मे महिन्यात आय.सी.ए.आय. तर्फे झालेल्या सी. ए च्या परीक्षेत मुंडेवाडीतील आसिफ मुजावर उत्तीर्ण झाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आसिफ यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतुन आणलेले हे यश निश्चितच कौतुकस्पद आहे . आसिफचे आई वडील शेतकरी असून आपल्या मुलांने खेचून आणलेले हे यश पाहून त्यांनी आसिफ ला पेढे भरवून आपला आनंदोत्सव साजरा केला .आसिफ यांचे प्राथमिक शिक्षण मुंढेवाडी मधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले , माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती विद्यालय मुंढेवाडी तर उच्च माध्यमिक व बी. कॉम ही पदवी परीक्षा पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातुन प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. आसिफ हे पदवी परीक्षेच्या दुसऱ्या वर्षी असतानाच अत्यंत अवघड असणारी सी. ए ची पूर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाले. तिथेच त्यांनी निश्चय केला की आता काही केल्या माघार नाही असे ठरवून पुढील सी. ए च्या परीक्षेसाठी ते पुण्यात दाखल झाले. घरची परिस्थिती लक्षात घेता शिक्षण पूर्ण करणे सोपे नव्हते परंतु त्यांनी प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा सी. ए फायनल पर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पार केला. तसेच त्यांनी आपल्या मनोगतामध्ये, अभ्यास करीत असताना आलेल्या अडचणीवर कशी मात केली त्याचबरोबर गावातील तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना सांगितले की, त्यांना अडचणीच्या काळात मदत करणारे त्यांचे मित्र मंडळी यांचेही त्यांनी आभार मानले तसेच त्यांचे मार्गदर्शक सर्वात शेवटी गावातील तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या यशामध्ये त्यांना त्यांचे गुरु स्थानी असणारे अफजल शेख तसेच सी. ए संतोष देवकर, सी. ए यशवंत खुंटवड, सी. ए ज्ञानेश्वर अरोटे, कवठेकर क्लासेसचे प्रा. कवठेकर सर, प्रा.खर्डीकर, तंटक,प्रा.हरिदास गलांडे, शकील मुजावर, प्रवीण बडे,वासुदेव गलांडे, फिरोज मुजावर,पराग दानवले,नझीम मुलाणी, विजय जगताप, हनुमंत डोंगरे तसेच मित्र परिवार इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.
छायाचित्र- मुलगा आसिफ सी.ए. झाल्याचे पाहून आई-वडिलांना अपार आनंद झाला यावेळी मुलाला पेढा भरविताना आई बिस्मिला व वडील जैनुद्दीन सोबत भाऊ शकील मुजावर.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


