पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
व Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 13 August 2017
प्रथम वर्ष अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांचे स्वेरीत उत्साहात स्वागत
पंढरपूरः-‘खुर्चीवर बसणे सोपे आहे परंतु एवढा वेळ बसणे ही अवघड गोष्ट आहे. प्राचार्य डॉ. रोंगे सर हे विद्यार्थ्यांसाठी देत असलेला वेळ पाहून विद्यार्थ्याला यश मिळणारच! आज या महाविद्यालयाला प्राचार्य डॉ.रोंगे सरांचे कॉलेज म्हणून महाराष्ट्रभर ओळखतात. ज्यावेळी प्राचार्यांच्या नावाने एखादे महाविद्यालय ओळखले जाते त्यावेळी त्यांचे विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेत असलेल्या परिश्रमाची ओळख पटते. या महाविद्यालयाचे मी नियमित अपडेट्स घेत असतो. आजही जिल्ह्यात हे महाविद्यालय अग्रेसर आहे. त्याचे एकच कारण म्हणजे ‘पंढरपूर पॅटर्न’ आणि कडक शिस्त होय. आदरयुक्त संस्कृती व शिस्त म्हणजेच या शैक्षणिक संकुलासाठी विकासाचा पायाच असून या ठिकाणी सामान्य बुध्दीमत्तेचा विद्यार्थी सुध्दा कठोर परिश्रमाच्या जोरावर आणि शिक्षक वर्ग देत असलेल्या योग्य दिशा व अचूक मार्गदर्शनामुळे विद्यार्थी स्वतःचे असे उज्वल भविष्य निर्माण करत आहेत.’ असे प्रतिपादन अकलूज मधील शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य व महाराष्ट्र प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केले.
श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख बोलत होते. प्रारंभी सर्व विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. व्यासपीठावर या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणुनगोरख जानकर व लिंगे तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. शीतल ताम्हाणे उपस्थित होत्या. प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ.एस.ए.लेंडवे यांनी प्रास्ताविकातून सर्वांचे स्वागत करून अभ्यासाची क्षमता,त्याला लागणारा कालावधी,प्रॅक्टिस सेशन,रात्र अभ्यासिका, प्रश्नसंच सोडविणे, पंढरपूर पॅटर्न,ट्रिपल पी.ई. प्रथम वर्ष अभियांत्रिकी बाबत अद्यावत सुविधा,उपलब्ध साधने, अभ्यासाची पध्दत, गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी असणारी ‘कमवा व शिका’ योजना व आदींची देखील सविस्तर माहिती दिली. संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढ्याचे प्राचार्य डॉ. एन.बी.पवार यांनी ‘विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्याच्या पुर्ततेसाठी चिकाटीने प्रयत्न करावेत.माझ्या दोन्ही कन्या याच ठिकाणी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून कॅम्पस प्लेसमेंट मधून कंपनीत नोकरीस लागल्या असून नोकरीच्या ठिकाणी कसे गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची गरज असते त्या प्रमाणे स्वेरीत तसे उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली जाते.’ असे अनुभवाद्वारे सागितले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ यांनी आजपर्यंतची कंपनीत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी सादर करून कंपनीसाठी विध्यार्थांना स्वतंत्र असे ट्रेनिंग कसे दिले जाते हे सांगितले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘स्वेरी ही शैक्षणिक संस्था पालकांच्या विश्वासावर व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठीच येथील प्राध्यापक वर्ग अहोरात्र परिश्रम घेत असतात. मिळणारे आदरयुक्त संस्कार व कठोर परिश्रम केल्यामुळेच विद्यार्थी यशस्वी होत आहेत.’ असे सांगून नवनवीन संकल्पना, उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.आता एन.बी.ए. मानंकन मिळाल्यामुळे पालकांचा आणखी विश्वास वाढला आहे.’ असे सांगितले. संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे महत्व विशद करताना, ‘यश मिळविणे हे अवघड नसते. परंतु इच्छाशक्ती अभावी बऱ्याच वेळा सोपी वाटणारी गोष्ट अवघड बनते. त्यासाठी सर्वप्रथम आपल्यातील न्यूनगंड झटकून आपण कोठून आलो हे न पाहता आपल्याला नेमके कुठे जायचे आहे? यावर लक्ष केंद्रीत करा म्हणजे सुयोग्य मार्ग सापडेल.’ असे अनुभवाचे बोल सांगितले. पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना गोरख जानकर म्हणाले, ‘या महाविद्यालयात विद्यार्थांचे उज्वल भविष्य असल्यामुळेच महाविद्यालय प्रवेश संख्या व वार्षिक परीक्षेचा यामध्ये सलग तिसऱ्यांना अव्वलस्थान राहिले आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात करीअर करताना, तंत्रज्ञान विषयक प्राथमिक ज्ञान भक्कम करण्यासाठी हा पंढरपूर पॅटर्न अतिशय उपयुक्त आहे.’पालकांच्यावतीने बोलताना सौ. शीतल ताम्हाणे म्हणाल्या,‘या ठिकाणी मिळणाऱ्या शिक्षणाची पध्दत पाहील्यास भविष्यात नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणारेच जास्त होताहेत. त्यामुळे पालकवर्ग पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी स्वेरीचीच निवड करतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने कॉलेज प्रशासन अत्यंत काळजी घेतात त्यामुळेच मुलींची संख्या इथे अधीक जाणवते. वसतिगृह अधिक्षक प्रा पवार सरांच्या चौकस नेतृत्वामुळे पालकवर्ग निश्चिंत असतात.’यावेळी पालकांनी मनोगतातून महाविद्यालयाच्या उत्कृष्ठ नियोजनाबध्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी टाटा कन्सल्टंन्सी सर्विसेसचे अधिकारी स्निग्धा गोवित्रीकर, लीड ऑफिसर अंकुर सिन्हा, कमल दिग्रसे व टीसीएस कंपनीत सर्विस करत असलेले व स्वेरीचे माजी विद्यार्थी सचिन भोसले यांनी देखील आपल्या मनोगतात स्वेरीतील विद्यार्थ्यांची अधिक निवड का होते हे स्पष्ट करताना म्हणाले की, कंपनीला विद्यार्थी नेवून त्या ठिकाणी पुन्हा प्रशिक्षण देवून विद्यार्थी तयार करण्यास वेळ लागतो परंतु इथे ट्रेनिंग अंड प्लेसमेंट मधूनच विद्यार्थ्यांना ट्रेन करून पाठविले जाते. त्यामुळे आम्हा कंपनी धारकांना तयार व परिपक्व विद्यार्थी मिळतात. त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांची कोणत्याही कंपनीत वर्णी लागण्याची शक्यता जास्त असते.’ यावेळी सीजीपीए पॅटर्न नुसार १० पैकी १० गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी.नाडगौडा, विश्वस्त बी.डी.रोंगे, प्रा. एस.एन.कुलकर्णी, फार्मसीचे प्राचार्य डॉ.आर.जी.कुलकर्णी, डॉ. खडके, अधिष्ठाता डॉ. मुकणे, अधिष्ठाता डॉ. उत्पात, अधिष्ठाता प्रा. गवळी, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षक वर्ग, विभागप्रमुख महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्ष विभागातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रा. यशपाल खेडकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर डॉ. एस. ए.लेंडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
छायाचित्रः- १.प्रथम वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रमाचे उदघाटन करताना करताना अकलूज मधील शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख सोबत डावीकडून श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, विश्वस्त बी.डी.रोंगे, संत दामाजीचे प्राचार्य डॉ. एन.बी.पवार,डावीकडून टाटा कन्सल्टंन्सी सर्विसेसचे अधिकारी स्निग्धा गोवात्रीकर, लीड ऑफिसर अंकुर सिन्हा,कमल दिग्रसे व टीसीएस कंपनीत सर्विस करत असलेले व स्वेरीचे माजी विद्यार्थी सचिन भोसले, महीला पालक प्रतिनिधी सौ. शीतल ताम्हाणे,पालक प्रतिनिधी गोरख जानकर,आदी.
२. यशवंत व गुणवंतांचे कौतुक करताना प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख व मान्यवर.
From-
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
9850 24 21 55 .
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

