👁 7 Views

‘ नमामी चंद्रभागा ’ अभियानात जनसहभाग महत्वाचा -जलतज्ज्ञ-डॉ.राजेंद्रसिंह राणा

     पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 13  August 2017

पंढरपूर दि.13:- चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखून ही नदी प्रदुषणमुक्त करुन तीचे संवर्धन करण्यासाठी शासन ‘नमामि चंद्रभागा’ हे  अभियान राबवित असून, समाजानेही  या अभियानात पुढे येवून नदी स्वच्छता व जलसंवर्धनासाठी जलसाक्षर होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन  जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी केले.


      ‘नमामि चंद्रभागा’ जलसाक्षता दिडींतील जलकुंभ पुजानाचा कार्यक्रम श्री. संत तुकाराम भवन येथे आयोजित करण्यात आला होता. नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, उपनगराध्यक्षा सुजाता बडवे, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, वनराईचे किशोरभाई धारिया, ज्ञानेश्वर महाराज जळगावंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी बोलताना डॉ.राजेंद्रसिंह राणा म्हणाले, चंद्रभागा नदी ही वारकरी व भाविकांच्या श्रध्देचे स्थान असून, नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने ‘नमामि चंद्रभागा’ अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे.प्रदुषण हा नद्यांचा सर्वात मोठा शत्रु असून. उगमापासून नदीपात्रात   सांडपाणी, कचरा, मैला जाणार नाही यांची दक्षता सर्वांनी घेणे गरजेचे आहे.चंद्रभागा नदीवरील भीमा नदीच्या उपनद्यावर नागरीवस्ती व कारखान्यातून येणारे सांडपाणी वेगळे वाहते करावे अथवा येणा-या सांडपाण्यावर प्रक्रियाकरुन शुध्द पाणी नदीत सोडावे . चंद्रभागा नदीला शुध्द स्वरुपात वाहती करणे हे समाजातील प्रत्येक नागिरांचे कर्तव्य असून, वनांचेही संरक्षण करणेही गरजचे आहे असेही त्यांनी सांगितले. या जलसाक्षता दिडींतील जलकुभांत  12 नद्या  व 6 उपनद्याचे पाणी  एकत्र करुन ही जल दिंडी विजापुर पर्यंत जाणार आहे यावेळी चंद्रभागा नदी स्वच्छतेसाठी जलसेवक होण्याचे आवाहनही डॉ.राणा यांनी केले.
      प्रारंभी ‘नमामि चंद्रभागा’जल साक्षरता दिंडी  शिवाजी चौक येथून, प्रदक्षिणा मार्गावरुन महाव्दार घाट येथे जावून जलकुभांचे पुजन व आरती करण्यात आली.  त्यानंतर  सामुदायिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली. तुकाराम भवन येथे विद्यार्थ्यांनी जलसाक्षर प्रबोधनपर पथनाट्य सादर केले.. यावेळी वनराईचे सदस्य, मान्यवर नागरीक, महाराज मंडळी, विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
                     00000
 फोटो- उमेश  टोमके

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *