👁 11 Views

के. बी. पी. च्या कु. वैशाली सातपुते यांना राज्यशास्त्र विषयात सुवर्णपदक

Pandharpur Live : 

पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैशाली सातपुते हिस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने एप्रिल २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेत राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करुन विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल ‘डॉ. श्रीकांत दत्तात्रय येळेगावकर सुवर्णपदक’ प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या १५ व्या पदवीदान समारंभात दि. २७ डिसेंबर रोजी हे सुवर्णपदक त्यांना बहाल करण्यात येणार आहे. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी बी. ए. परीक्षेत विद्यापीठ पातळीवर राज्यशास्त्रात प्रथम येणाऱ्यास हे सुवर्णपदक ठेवले आहे.

राज्यशास्त्र विषयातील सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागीय चेअरमन संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यिनीचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थिनीस राजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. दत्तात्रय काळेल व प्रा. दादासाहेब हाके यांनी मार्गदर्शन केले. कु. वैशाली सातपुते हिचे या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे. 

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *