👁 13 Views

सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में…किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है?- खा. संजय राऊत

Pandharpur Live :
सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में… किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है? या राहत इंदोरी यांच्या ओळी संजय राऊत यांनी ट्विट केल्या आहेत. त्यांच्या या ट्विटचा रोख केंद्र सरकार राबवू पाहत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दिशेने असल्याचा अंदाज आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशातलं वातावरण तापलं आहे. नवा कायदा देशहिताचा असल्याचं म्हणत भाजपाकडून या कायद्याचं समर्थन केलं जात आहे. तर विरोधकांनी हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचं म्हणत देशभरात आंदोलनं सुरू केली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोदी सरकार आणि भाजपाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण तापलं असताना राऊत यांनी हे ट्विट केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. त्यामुळे या तीन देशांमधून भारतात आलेल्या मुस्लिमेतर समुदायांना (हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध, ख्रिश्चन) भारताचं नागरिकत्व मिळू शकेल. हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणार असल्यानं तो संविधानविरोधी असल्याचा आक्षेप काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी नोंदवला आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतात सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरले आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनाबाबत काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींवेळीही संजय राऊत सातत्याने सूचक ट्विटस करून शिवसेनेची भूमिका मांडत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सुधारित नागरिकत्व कायद्यावर भाष्य केलं होतं. नव्या कायद्याबद्दल अनेकांच्या मनात भीती आहे. मात्र नागरिकांनी काळजी करू नये. त्यांच्या हितांचं आणि हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार समर्थ आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी हिवाळी अधिवेशनानंतर बोलताना दिली. राज्यातल्या जनतेनं मनात कोणतेही गैरसमज ठेवू नये, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *