👁 11 Views

रावेर येथील श्री व्ही एस नाईक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय माजी विद्यार्थी मेळावा संपन्न !!

Pandharpur Live : 
 (रावेर ) -येथील श्री व्ही एस नाईक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .सन 1978 ते आजपर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचेl आयोजन माजी विद्यार्थी संघटना व व्ही एस नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी .व्ही .दलाल हे होते. माजी विद्यार्थी संघटनेने महाविद्यालयासाठी कोणते उपक्रम राबवावे याविषयीची माहिती  प्राचार्य दलाल यांनी दिली. या वेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री सी एस पाटील सर यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी संघटनेकडून कोणते उपक्रम पुढील काळात राबवले जातील याविषयीची माहिती त्यांनी दिली. सदर कार्यक्रमात  समाजसेवी प्रवासी नेतेश्री प्रशांत बोरकर  जोरदारपणे भाषण केले व शैक्षणिक अनुकूल वातावरण असून बाहेर ही उच्च शिक्षण साठी मुलांना जावे लागते त्याची कारणे शोधून प्राथमिक शिक्षण पासून उच्च शिक्षण पर्यंत दर्जेदार शिक्षण। उपलब्ध करून देण्याचे त्यासाठी आवश्यक प्रयन्त करण्याची अपेक्षा केली व राजकीय नेत्यांनी संदर्भात रावेरला न्याय देणाची गरज व्यक्त केली.

यावेळी टी .बी. महाजन सर ,श्री राजू खिरवडकर, अॅड रमाकांत महाजन ,राजकिरण शिवदे, प्रणित महाजन ,लखन महाजन, स्मिता वाणी, सुनील वाघ ,आरती पाटील या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .त्यांनी आपल्या महाविद्यालयातील आठवणींना उजळा दिला .सदर कार्यक्रमात माजी विद्यार्थी श्री.प्रशान्त बोरकर वाय. टी. महाजन यांचा सत्कार करण्यात आला .ते गेले दहा वर्षापासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वेटलिफ्टिंगचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत महाविद्यालयाला अनेक पदके मिळाली आहेत त्याचबरोबर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी राजकिरण शिवदे व कुंदन मानकर सेट , नेट  परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर जी.आर .ढेंबरे यांनी केले .तर आभार प्रदर्शन डॉक्टर एस.जी .चिंचोरे यांनी केले .रावेर परिसरातून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते. 

भविष्यकाळात माजी विद्यार्थी संघटनेकडून विविध उपक्रम राबवले जातील असे माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले .माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर एस .जी. चिंचोरे ,प्राध्यापक डॉक्टर जे .एम.पाटील ,प्राध्यापक सी .पी. गाडे ,प्राध्यापक एस .डी .धापसे प्राध्यापक डॉक्टर बी.जी. मुख्यदल, प्राध्यापक एम .एम .पाटील ,प्राध्यापक एस . यु . पाटील, प्राध्यापक पी .व्ही.पाटील सर्व शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी संघटना यांचे सहकार्य लाभले .
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *