👁 11 Views

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून नववर्षाची मोठी भेट… 1 जानेवारीपासुन बँकेकडून मिळणार ‘ही’ सुविधा ‘मोफत’

Pandharpur Live : 50 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या सर्व कंपन्यांना आपल्या ग्राहकांना रुपे डेबिट कार्ड आणि युपिआय क्यूआर कोडद्वारे पैसे देण्याची सुविधा पुरविणे अनिवार्य राहणार आहे.

२०२०-२०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये मर्चंट डिस्काउंट रेटचा खर्च सरकार उचलणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच जानेवारीपासून ५० कोटी पेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना Rupay डेबिट कार्ड आणि युपीआय क्युआरद्वारे पेमेंटची सुविधा द्यावी लागेल. या कंपन्यांना एमडीआर फी आकारणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

डेबिट कार्डच्या पेमेंटवर एमडीआर चार्ज केला जातो, जो मर्चंट आपल्या सर्विस प्रोव्हायडरला देतो. पीओएस टर्मिनलवर प्रत्येकवेळी कार्ड स्वाइप करताना शुल्क आकारले जातात.

हे शुल्क ऑनलाईन आणि क्यूआर कोडद्वारे व्यवहार करण्यासाठी आकारले जाते.
मर्चंटद्वारे दिलेले शुल्क तीन स्केटहोल्डर मध्ये विभागले जाते. यामध्ये व्यवहाराची सुविधा देणारी बँक, पीओएस स्थापित करणारा विक्रेता आणि कार्ड नेटवर्क सेवा देणाऱ्यांचा समावेश असतो. क्रेडिट स्वाइप करताना हा शुल्क २% पर्यंत असू शकतो.

२०१९ च्या अर्थसंकल्पामध्ये सादर झालेल्या पहिल्या अर्थसंकल्पात ५० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायांनी डिजिटल पेमेंट करताना आपला शुल्क कमी करावा. तसेच हा खर्च आरबीआयने सहन करावा, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली होती. तसेच १ फेब्रुवारीला मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरे बजेट अर्थमंत्री सादर करतील.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *