सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असलेला एकही रुग्ण आढळुन आला नाही, ही बाब दिलासादायक आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच पंढरीत हा सर्व्हे सुरु आहे, ही बाब कौतुकास्पद असली तरी शहरभर फिरणार्या अशा प्रतिनिधींच्या व नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने सर्व प्रतिनिधींच्या हातात हॅन्डग्लोव्हज असणे व सर्वांनी हॅन्ड सॅनिटायझर्सचा वापर करणे अत्यावश्यक आहे म्हणुन पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने सर्व्हेसाठी संपुर्ण शहरात फिरत असलेल्या या प्रतिनिधींचे संरक्षणासाठी व कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वांनाच सॅनिटायझर्स व हॅन्डग्लोव्हज पुरविण्यात यावेत असे वाटते.
Posted inPandharpur
कोरोना व्हायरस- पंढरीत सर्व्हे करणार्या शासन प्रतिनिधींच्या सुरक्षेचे काय? त्यांना हॅन्डग्लोव्हज, सॅनिटायझर्स दिलेत का?
पंढरपूर लाईव्ह (विशेष प्रतिनिधी):- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर देेशभरात लॉकडाऊन आहे, संचारबंदी लागु आहे; याच पार्श्वभुमीवर सध्या पंढरपूर शहरातील विविध भागात शासनाचे प्रतिनीधी घरोघरी फिरत आहे. शासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा शहराचा सर्व्हे करण्याचा सूचना दिल्या आहेत. याची मदत कोरोना पासुन आपले गाव/शहर दुर ठेवण्यासाठी होणार आहे. सर्व्हे करत असलेल्या या प्रतिनिधींमध्ये अनेक शिक्षक व नगरपरिषदेचे कर्मचारी यांचा सहभाग आहे. परंतु सर्व्हे करण्यासाठी शहरात घरोघरी जाणार्या या प्रतिनिधींचा कोरोना विषाणुच्या संसर्गापासुन बचाव करण्यासाठी त्यांचेकडे हॅन्डग्लोव्हज, सॅनिटायझर्स आहेत का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. कारण सर्व्हे करण्यासाठी फिरत असलेल्या अनेक प्रतिनिधींना या सुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या नसल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.
आता 50 ते 60 घरासाठी एक प्रतिनीधी अशा पध्दतीने शिक्षक व नगरपरिषद प्रतिनिधी असे नियोजन केले आहे. या सर्व्हेला सुरवात झाली आहे. सर्व नागरिकांनी आपल्या भागातील प्रतिनिधींना सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा साधनाताई भोसले, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, मुख्यआधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केलेले आहे. पंढरपूर नगरपरिषद आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या यासंदर्भातील पत्रकात मात्र सदर प्रतिनिधींच्या सुरक्षिततेसंदर्भातील कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.

