👁 9 Views

आज पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत 19 ने वाढ; 3 महिलांचा मृत्यु… पुण्यात मास्क वापरणे बंधनकारक- विभागीय आयुक्तांची महत्वपुर्ण माहिती

Pandharpur Live- आज दि. 9 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजपर्यंत पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत 19 ने वाढ झालीय. कोल्हापूरमध्येही 1 ने वाढ झालीय. आजपर्यंत कोरोना बाधीतांच्या 210 केसेस आढळुन आल्या आहेत. आज पुण्यात 3 महिलांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 


आज पुणेत कोरोना बाधीतांच्या 19 केसेस ची वाढ झालीय तर  कोल्हापूरात 1 केसेस वाढलीय, पुणे-159, सांगली 13 अशी कोरोना बाधितांची एकुण आकडेवारी असुन पुणे येथे 21 व सातारा येथे 1 अशा एकुण 22 कोरोनाबाधीतांचा आजपर्यंत मृत्यु झाला आहे.

जेष्ठ नागरिक या आजाराला बळी पडत आहेत. त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती आहे की, आपण बाहेर पडु नका, जेष्ठ नागरिकांना बाहेर पडु देवु नका. अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, बाहेर पडल्यास मास्क वापरा, पुण्यात मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *