पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. केंद्र सरकार तर्फे विविध प्रकारच्या यंत्रणा राबविण्यात आल्या आहेत. पण लॉकडाऊन मुळे जे विद्यार्थी इतर राज्यांमध्ये अडकले आहेत त्यांच्याबाबत एकदम स्पष्ट आणि परखड भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. याविषयी विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात केंद्र सरकार सहकार्य करत नसेल तर महाराष्ट्राने मागे राहू नये असे ते म्हणाले आहेत. केंद्र सरकारबद्दल स्पष्टपणे नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे तसेच महाराष्ट्र सरकारला आपण मागे राहू नये व या विषयावर आपल्या पध्दतीने निर्णय घेऊन कामाला लागावे असे सुचवले आहे.
नेमके काय म्हणाले रोहित पवार?
इतर राज्ये आपापल्या विद्यार्थ्यांना बस पाठवून आणत आहेत. आता आपल्याला जर केंद्र सरकार मदत करत नसेल तर आपण आपल्या लोकांसाठी मागे राहू नये असे ते म्हणाले. तसेच हे माझे व्यक्तिगत मत असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यविषयक नियम पाळून राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना आणावंच, अशी माझी विनंती आहे” असेही पुढे बोलताना ते म्हणाले. इतर राज्यांमध्ये असल्याने त्यांना तिथली भाषा, व्यवस्था ही फारशी अवगत नाही. त्यामुळे त्यांचे भोजन, आरोग्य आणि आर्थिक समस्या असा सामना या विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.


