👁 10 Views

कोरोना विषाणुच प्रादुर्भाव रोखणेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – आ.प्रशांत परिचारक

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी मागील तीनचार महिने प्रशासनाला पंढरपूरातील नागरिकांनी ज्या पध्दतीने सहकार्य केले त्याच पध्दतीने यापुढील काळातही सहकार्य करावेअसे आवाहन आ.प्रशांत  परिचारक यांनी संतपेठमहापूरचाळबडवेचररोहिदास चौक येथील कंटेन्मेट झोनमधील नागरिकांना भेटीचे वेळी केले.


     मागील 15 दिवसापासून पंढरपूरातील परिस्थिती निंत्रणाबाहेर जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहेपंढरपूर मध्ये सध्या सुमारे 100 हून अधिक कोरोना विषाणुमुळे बाधित रूग्ण संख्या झाली आहेया रूग्णांमुळे पंढरपूरातील बहुतांशी भाग हा कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर होवून बंद करणेत आला आहेत्या भागातील नागरिक हे भयभीत झाले असून त्यांना आधार देणेत्यांचे अडीअडचणी जाणून घेणेसाठी आज आ.प्रशांत परिचारक यांनी महापूर चाळबडवेचररोहिदास चौकसंतपेठ भागातील कंटेन्मेट झोनला तेथील नगरपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकांसह भेट देवून धीर देणेचे काम केले.


यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणालेदाट लोकवस्ती असलेल्या पंढरपूरातील भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहेत्यामुळे बहुतांश भाग कंटेन्मेट झोन जाहीर झाला आहेतेथील रहिवाशी यांनी घाबरून न जाता धैयार्ने संकटाला सामोरे जावेया भागातील सर्वच नागरिकांच स्ट्रीमिंगऑक्सिजन तपासणीसोबत रॅपिड तपासणी करणेवरही भर दिला जाणार आहेरॅपिड टेस्टमुळे कोरोनाचे निदान लवकर होणेस मदत होतेतसेच यावेळी त्यांनी किराणा मालरेशनभाजीपालादूध आदी दैनंदिन गरजेच वस्तूसाठी व त्या क्षेत्रातील बंद असलेले मेदिकल दुकानेदवाखाने सुरू करणेबाबत स्थानिक नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करणेच्या सूचना दिल्या.

यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मनोरकरमाजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे,  नगरसेवक कृष्णा वाघमारेनाना वाघमारेअमोल डोकेउमेश सर्वगोड आदीसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *