👁 13 Views

लोटसची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

पंढरपूर -कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रसिव एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूलने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. 

ग्रामीण भागातील  एक सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून लोटस स्कूलचे  नाव घेतले जाते. मार्च २०२०मध्ये घेण्यात आलेल्या ‘सी.बी.एस.ई’ दहावीच्या परीक्षेचा  निकाल जाहीर झाला यामध्ये लोटस मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले यामध्ये रणजीत डांगे याने ९०.२० टक्के एवढे गुण घेऊन शाळेमध्ये पहिला येण्याचा मान मिळवला. जान्हवी माळी हीने ८५ टक्के एवढे गुण मिळवून दुसरी आली तर सुमित रणदिवे ८३ टक्के एवढे गुण घेऊन शाळेत तिसरा आला.

त्याचबरोबर विपिन कुमार ८२.६०टक्के, तृप्ती डुबल ८०.८० टक्के, वैष्णवी नागणे ८०.८० टक्के यांनी चांगले गुण प्राप्त केले आहेत. तसेच रणजीत डांगे याने इंग्रजी विषयामध्ये ९४ गुण मिळवले, तृप्ती डुबल हिने  हिंदी विषयामध्ये ९७ गुण मिळवले, वैष्णवी नागणे हिने सामाजिक शास्त्र विषयामध्ये ९२ गुण मिळवले तसेच कम्प्युटर या विषयामध्ये रणजीत डांगे आणि तृप्ती डुबल यांनी सर्वात जास्त ९७ मार्क मिळवले आहेत. अशी माहिती लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी दिली. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, अध्यक्ष बी. डी. रोंगे, उपाध्यक्ष एच.एम. बागल, संस्थेचे व्यवस्थापक दादासाहेब रोंगे, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,सर्व पदाधिकारी, विश्वस्त, प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण, विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक,विषय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *