👁 10 Views

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मराठी निबंध स्पर्धा संपन्न”

“गुरु ब्रह्मा गुरु विष्णु ! गुरु देवो महेश्वरा ! गुरु साक्षात परब्रह्म! तस्मै श्री गुरवे नमः!! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरूचे महत्त्व खूपच अनन्यसाधारण आहे या अनुषंगाने गुरपोर्णीमेनिमीत्त दि.०५.०७.२०२० रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाले मध्ये इयत्ता पहिली ते आठवीची ऑनलाइन मराठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. कोव्हीड-१९ मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याचा विचार करून कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील शिक्षक ऑनलाईन शिक्षणाद्वारे ज्ञानदानाचे महान कार्य करत आहेत. त्याचे अवलोकन करण्यासाठी कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेध्ये मराठी निबंध स्पर्धा आयोजित केली यामध्ये पहिली व दुसरी अ-गट, तिसरी व चौथी ब-गट, पाचवी व सहावी क-गट, सातवी व आठवी ड-गट असे गट पाडण्यात आले.          
 
अ-गटामध्ये तक्ष राऊत इयत्ता पहिली-प्रथम क्रमांक, श्रीरंग पवार इयत्ता दुसरी-द्वितीय क्रमांक, तनिष्का माळी इयत्ता दुसरी-तृतीय क्रमांक मिळविला. ब-गटामध्ये प्रगती खडके इयत्ता चौथी- प्रथम क्रमांक, आर्या खिलारे इयत्ता तिसरी -द्वितीय क्रमांक, सांची धाईंजे इयत्ता तिसरी-तृतीय क्रमांक, क-गटामध्ये मिहीर बडवे इयत्ता पाचवी-प्रथम क्रमांक,समृद्धी ताठे इयत्ता सहावी-द्वितीय क्रमांक,  ज्ञानदा पवार इयत्ता पाचवी-तृतीय क्रमांक, ड-गटामध्ये सोहम लवेकर इयत्ता सातवी- प्रथम क्रमांक, कृष्णा मकर इयत्ता सातवी-द्वितीय क्रमांक, ऐश्वर्या शिंदे इयत्ता आठवी-तृतीय क्रमांक यांनी सुंदर असे निबंध लिहून यश संपादन केले.
या सर्वांना प्रशालेचे प्राचार्य सौ शैला परेश कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके व यावेळी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच या विद्यार्थ्यांना सौ कविता पवार, श्री मंगेश भोसले सौ योगीनी ताठे, सौ संध्या जाधव या शिक्षकांचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *