आज पंढरपूर शहर व ग्रामीण मध्ये मिळुन एकुण 50 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. वाखरी येथील कोविड सेंटरमधुन आज 7 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.
आजची कोरोना पॉझिटीव्ह असलेल्यांची संख्या पाहता पंढरपूर शहरातील बाधितांची संख्या सध्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येतेय.
आजपर्यंत एकुण 211 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असुन 46 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकुण 163 जणांवर उपचार सुरू आहेत.
उपचार सुरू असलेल्या रूग्णांमध्ये
पंढरपूर शहरातील 119, ग्रामीण मधील 43 तर इतर तालुके व जिल्ह्यातील 1 रूग्णाचा समावेश आहे. अशी माहिती पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे.




