👁 12 Views

कोविड संदर्भात राज्यात २ लाख १ हजार गुन्हे दाखल… ३१ हजार व्यक्तींना अटक… १०० नंबरवर १ लाख ७ हजार फोन – गृहमंत्री अनिल देशमुख

 

   मुंबई दि.२२-  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख १ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

    राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २१ जूलै  या कालावधीत  कलम १८८ नुसार  ,०१,१५८ गुन्हे नोंद झाले असून ३१,३३२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी  ६ लाख २३ हजार ४४१ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

कडक कारवाई

            कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दलआरोग्य विभागडॉक्टर्सनर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

 या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३१५ घटना घडल्या. त्यात ८८१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबरवर १ लाख ७ हजार  फोन

            पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  ,०७,९४० फोन आलेत्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. 

       तसेच राज्यभरात पोलीसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८०५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

       या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 

पोलीस कोरोना कक्ष

     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ४८ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५१ठाणे शहर ७  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी,

रायगड २,पुणे शहर ३नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी,नवी मुंबई  SRPF ,पालघर २,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १,औरंगाबाद शहर १,जालना ग्रामीण १,नवी मुंबई १,

अशा ८९ पोलीस बांधवांचा मृत्यू झाला. पोलीसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेतयाकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १८५ पोलीस अधिकारी व १३९८ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सोशल डिस्टेन्सिंग पाळा

         कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावेअसे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *