👁 9 Views

आज एकुण 18 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह… काल उपचारादरम्यान एकाचा मृत्यू!


आज पंढरपूर तालुक्यात एकुण 18 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 54 जणांच्या रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये 1 ग्रामीण तर 17 शहर असे एकुण 18 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. उपचारादरम्यान एका कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे. दि. 21 जुलै 2020 रोजी कान्हापुरी, ता. पंढरपूर येथील 70 वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाला आहे. त्यांचेवर अकलुज येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 
आज वाखरी येथील कोविड सेंटर येथे 38 आणि गजानन  महाराज मठामध्ये 78 असे एकुण 116 जणांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले आहेत. सद्यस्थितीत एकुण 197 जणांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *