लोहारा/बाळू माशाळकर
ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी रात्री-बेरात्री वणवण करावी लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
बेंडकाळ ता.लोहारा येथील पाणी प्रश्न खुपच गंभीर बनत असुन याबाबत सविस्तर वृत असे की,1500 ते 1600 लोकसंख्येच्या या गावामध्ये आज पाण्यासाठी दोन सार्वजनिक विहीरी असुन दोन बोअर आहेत. मनरेगा अंर्तगत अजुन एक विहीर मंजुर झाली होती माञ विहीरीचे काम न करताच ग्रा.पं. ने विहीरीचा निधी उचलुन भ्रष्टाचार करुन बेंडकाळकर नागरीकांना पाण्यासाठी वेठीस धरले आहे.
दिवसभर काबाड कष्ट करुन राञभर नागरिकांना पाण्यासाठी जागरण कराव लागत आहे. राञी बारा बारा वाजता लाईट येते तर कधी येतच नाही, लाईट नाही आली तर खाजगी लोकांच्या विहीरी मधुन पाणी भरावे लागते.
पाण्यामुळे या पुर्वी एका व्यक्तीचा जीवही गेला आहे . ग्रा.पं ला याचे कोणतेही सोयर सुतक नसुन ग्रा.पं.च्या हलगर्जीपणामुळे जुलै महीन्या मध्ये सुध्या बेंडकाळ मध्ये पाणी नाही या मुळे नागरीकांना राञभर वणवण करत फिरावे लागत आहे. ग्रा.प कार्यालय जाणीवपुर्वक गावासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करत नसुन गावातील काही पाईपलाईनीचे बोगस कामं झाल्याचे दाखवत बिले उचलली. असे नागरीकामधुन बोलले जात आहे. तरी लवकरात लवकर पाणी प्रश्न मिटवा अन्यथा राजीनामा द्या! अशी मागणी ग्रामस्थांमधुन जोर धरु लागली आहे.

