आज श्रावण सोमवार निमित्त पंढरीतील समाजसेवक धर्मराज घोडके मित्र परिवाराचे वतीने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र बंदोबस्तात असलेल्या पोलीस बांधवांना फराळाचे व शुध्द पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
आपल्या रक्षणासाठी 24 तास ऑनड्युटी असलेले पोलीस बांधवांना सध्या कोविड-19 या आजाराला पसरु न देण्यासाठी कार्यरत आहेत. पोलीस बांधवांना गुन्हेगारी रोखण्यासोबतच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रशासनाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होणेसाठी बंदोबस्ताची दुहेरी जबाबदारी सध्या पार पाडावी लागत आहे. या कालावधीत पोलीस बांधवांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आज श्रावणी सोमवाराचे औचित्य साधून हा उपक्रम राबवत आहोत अशी माहिती समाजसेवक धर्मराज घोडके यांनी दिली.
समाजसेवक धर्मराज घोडके मित्र परिवाराकडून पोलीस बांधवांना त्यांचे कर्तव्य बजावण्याचे ठिकठिकाणी जाऊन आज केळी, फराळी चिवडा व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
यावेळी विश्वनाथ गोरे, पंकज तोंडे, गणेश देसाई, सचिन लिंगे, युवराज सलग, पांडूरंग डोके संदिप लिंगे आदी उपस्थित होते.



