👁 10 Views

धक्कादायक… तिरूपती मंदिराच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण! आत्तापर्यंत 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू !!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-

लॉकडाऊन नंतर तिरुपती मंदिर सुरू करण्यात आले. परंतु त्यानंतर मंदिराच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.  आत्तापर्यंत 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिर हे देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर समजले जाते. कोरोना काळात लॉकडाऊन जारी केल्यानंतर हे मंदिर 11 जून पर्यंत बंद होते. 11 जून रोजी हे मंदिर भाविकांच्या आग्रहाखातर उघडण्यात आले. त्यानंतर मंदिरातील 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी आतापर्यंत 403 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तिरुपती प्रशासनाने सांगितले की मंदिर सुरू करताना कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले. सर्व भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करण्यात आले होते. ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या त्याची सर्व स्तरांतून प्रशंसा करण्यात आली होती. फक्त मंदिर प्रशासनाच्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झालेली नाही. संपूर्ण राज्य आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे असे प्रशासनाने म्हटले. जुलैमध्ये देशभरातून 2 लाख 38 हजार भाविकांनी तिरुपती मंदिराचे दर्शन घेतल्याचेही प्रशासनाने नमूद केले.

आंध्र प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 10 हजार 820 रुग्ण सापडले आहेत. तर 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 27 हजार 860 रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 87 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात 1 लाख 38 हजार 712 सक्रिय रुग्ण आहे तर आतापर्यंत 2 हजार 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *