एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात ऑनलाईन पद्धतीने दि. ८ ऑगस्ट २०२० रोजी टेक्निकल क्वीझ स्पर्धा संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाॅकडाऊन कालावधीत घरी राहून “टेक्निकल क्वीझ स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेसा असोसिएशनचे सिद्धेश्वर दळवी, ऋतुजा पाटील, स्वप्नील जरे, सुहास जाधव, अजिंक्य कोळवले, ओंमकारेश्वर अडवळकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीतून काही विद्यार्थी निवडल्या नंतर दुसऱ्या फेरीत विजेता व उपविजेत्याची निवड करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
हि स्पर्धा मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या टेक्निकल क्वीझ स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर येथील चैतन्य माळी यांना प्रथम क्रमांक मिळाला तर पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील जयश धवाड यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. चंद्रकांत पवार, प्रा. हृषिकेश देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड मध्ये ऑनलाईन टेक्निकल क्वीझ स्पर्धेत सहभागी विद्यार्थी.

