पंढरपूर Live Online: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले असून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेट्सच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अजितदादांना दाखल करण्यात आले होते. अजित पवारांची कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती.
त्यानंतर अजितदादांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर उपचाराअंती अजितदादांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज दुपारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अजितदादांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते.
दरम्यान, घरी परतल्यानंतर ते आठ दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सद्वारे दिली आहे.

