👁 11 Views

“ऑनलाईन कोव्हीड-१९ जणजागृती राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचे यश”

कला ही मानवी जीवनाचा अविभ्याज अंग आहे, शिक्षणामध्ये सर्वच ललित कलांचा पाया असलेली चित्रकला ही मनाला फारच आनंद देणारी आहे. चित्रकलेमुळे कलाविष्काराचा आनंद तर मिळतोच पण त्याचबरोबर हस्ताक्षरही सुधारते, मनाची एकाग्रता वाढते आणि कल्पनाशक्तीलाही चालना मिळते तसेच आपण आपले विचार व भाव-भावना या चित्रांद्वारे मांडू शकतो.

याच चित्ररुपी जनजागृतीमध्ये कॉन्फडरेशन ऑफ युनेस्को क्लब आणि असोशिएशन ऑफ इंडिया व युनेस्को स्कूल क्लब्स ऑफ महाराष्ट्व्दारा आयोजित भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगीच्या इयत्ता ७ वी तील कु.भक्ती गणेश पवार, इयत्ता ८ वीतील मधुरा रविंद्र शिंदे व चि.प्रणव सुनिल पवार, इयत्ता ४ थीतील कु.प्रगती शितल खडके या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळविले.

या स्पर्धेच्या माध्यमातून कोव्हीड-१९ या जागतिक माहामारी मध्ये घ्यावयाची काळजी व संदेश आपल्या चित्रातून विद्यार्थ्यांनी दिला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक श्री नारायण कुलकर्णी  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

या यशस्वी विद्यार्थांना प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्रक, खडूपेटी देवून गौरविण्यात आले तसेच या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे ट्रस्ट्री श्री रोहन परिचारक यांनी अभिनंदन केले व रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, श्री राजेंद्र सावंत तसेच प्रशालेचे शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते.

फोटो– यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन करताना प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला         कर्णेकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *