👁 13 Views

स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या स्वास्थासाठी पिराची कुरोलीमध्ये दुग्धाभिषेक संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची प्रकृती उत्तम रहावी या हेतूने पिराची कुरोली (ता. पंढरपूर) मधील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान मंदिरात नुकताच दुग्धाभिषेक करण्यात आला.

        ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून भविष्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलणारे स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे हे नुकतेच कोविडची चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आले असून त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि संपर्कातील व्यक्तींना चाचणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे पाहून  डॉ. रोंगे सरांची प्रकृती पूर्ववत ठणठणीत होण्यासाठी मंदिराचे पुजारी राजेंद्र सुतार यांच्या हस्ते पिराची कुरोली येथील अनेक कार्यकर्ते व डॉ.रोंगे सर प्रेमींनी हनुमान मूर्तीची विधिवत पूजा करून मूर्तीला दुग्धाभिषेक घातला आणि डॉ. रोंगे सरांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना केली. यावेळी गणेश कौलगेबळीराम लामकानेधनंजय कौलगेबाळकृष्ण कौलगेमुन्ना मुजावर यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

 छायाचित्र- स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या स्वास्थासाठी पिराची कुरोलीमध्ये दुग्धाभिषेक करताना गणेश कौलगी व मंदिराचे पुजारी राजेंद्र सुतार आदी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *