👁 11 Views

400 फूट उंच डोंगरावर गळफास घेत अज्ञाताची आत्महत्या

 

धारुर तालुक्यात पुन्हा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चोरांबा येथील चारशे फूट उंच डोंगरावर  अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची


 घटना सोमवारी उघडकीस आली. थेटेगव्हाण येथील पोलीस पाटील यांच्या खबरीवरून धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 धारुर तालुक्यातील चोरांबा, थेटेगव्हाण जवळ असलेल्या चारशे फूट उंच डोंगरावर एका लिंबाच्या झाडाला 40 ते 45 वय असलेल्या इसमाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी गुरे चारणाऱ्या व्यक्तींना आढळून आला.


 चोरंबा येथील पोलीस पाटील यांना घटना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर धारूर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची खबर देण्यात आली. संबंधित इसमाने आत्महत्या केल्याचा अंदाज लावला जात आहे.


आत्महत्या करणारी व्यक्ती ही अज्ञात असून मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी ही घटना घडलेली असल्याने पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत मृतदेह होता. कापडी गमजाच्या सहाय्याने लिंबाच्या फांदीला गळफास घेतल्याचे दिसून आले. 

भोगलवाडी येथील आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी उत्तरीय तपासणी करून चोरंबा येथील गायरानामध्ये अंत्यविधी करण्यात आला. 


काही दिवसांपूर्वी धारुर घाटात व कारी शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असताना आज चोरांबा शिवारात मृतदेह आढळून आला. महिन्यातील ही तिसरी घटना आहे. वारंवार अशा घटना निदर्शनास येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *