👁 11 Views

भरधाव डंपरची दुचाकीला धडक बहिणीचा जागीच मृत्यू

 

भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील बहिणीचा जागीच मृत्यू झाला 


भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळागाव शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलावर झाला.


अपघातात मृत झालेल्या बहिणीचे नावं मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे असे आहे.


या दुर्दैवी घटनेत बहिणीचा मृत्यू झाला मात्र भाऊ सुदैवाने बचावला आहे. 

याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, दरम्यान पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे.


जळगावकडून धुळ्याकडे जात असताना महामार्गावरील शिवकॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर एमएच 19 सीवाय

 3311 या क्रमाकांच्या डंपरने मोपेड दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.डंपरची धडक बसताच दुचाकीवरील तरुणी रस्त्यावर पडली.


 यावेळी तिच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *