बिहारमधील सारण जिल्ह्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीला मिळून पाच जणी मारहाण करताना दिसून आल्यात.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीला मिळून पाच जणी जबरदस्त चोप देताना दिसून आल्या आहेत. कुणी या मुलीचे केस ओढतंय. कुणी तिला ढोसे हाणतंय, कुणी लाथा घालतंय. तर कुणी तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करतंय.
या दरम्यान एक मुलगा या मुलीला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना देखील दिसून आला आहे. पण तरिही या मुलीला मारहाण करणं सुरुत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलंय.
हा व्हिडीओ एका जत्रेतील असल्याचं बोललं जातंय. सोनपूर येथे एका जत्रेचं आयोजन करण्यात आलं. या जत्रेच तरुणींची झालेली फ्री स्टाईल हामामारी चर्चेत आली आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या तरुणीला मारहाण करण्यात आली, ती एका दुसऱ्याच मुलीच्या प्रियकरासोबत जत्रेत फिरत होती.
या जत्रेत त्या मुलीला आणि प्रियकराला रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यानंतर तुफान राडा झाला.






