👁 4 Views

मास्क आणि काळा चष्मा लावून ती ज्वेलरी शॉपमध्ये आली 10 लाखांचा नेकलेस चोरुन गेली अन्…..

 

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये दागिन्यांच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या एका महिलेने काही मिनिटांतच सोन्याचा हार चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीला गेलेल्या नेकलेसची किंमत 10 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.


कँट परिसरातील बलदेव प्लाझा येथील बेचू लाल सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या शोरूममध्ये 17 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेचा चोरी करतानाचा व्हिडिओ कैद झाला आहे. दुकान मालक गौरव सराफ यांनी सांगितले की, काही तासांनंतर नेकलेस चोरीप्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली.


एक महिला मास्क आणि चष्मा घातलेली व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती अनेक नेकलेसच्या डिझाईन्सकडे पाहते, नंतर चतुराईने तिच्या साडीखाली एक बॉक्स ठेवते. 


मग लक्ष विचलित करण्यासाठी ती ज्वेलर्सला आणखी काही हार दाखवायला सांगते. मग ती न आवडण्याचे कारण सांगून काहीही खरेदी न करता निघून जाते. याच दरम्यान सेल्समनला शंका येत नाही. महिलेने चोरलेल्या बॉक्समध्ये सोन्याचा हार आणि कानातले होते, ज्याची किंमत 10 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.


बलदेव प्लाझा येथील बेचू लाल सराफच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर रोजी शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. दागिन्यांची खरेदी करण्यासाठी अनेक महिला शोरूममध्ये पोहोचल्या होत्या. 


याच दरम्यान, हिरव्या साडीतली 45 वर्षीय महिलाही आली. महिलेने चेहऱ्यावर मास्क आणि काळा चष्मा लावला होता. तिचे वय आणि तिचा पेहराव बघून ती अशी घटना करेल याची कल्पनाही कुणालाही नव्हती.

कर्मचाऱ्यांनी तिला नेकलेस सेट दाखवायला सुरुवात केली. पण, महिलेच्या समोर दोन बॉक्स ठेवताच तिने लगेच दुसरा बॉक्स एका बॉक्सच्या वर ठेवला आणि नंतर दोन्ही बॉक्स एकत्र उचलून आपल्या मांडीवर ठेवले. 


काही वेळ पाहिल्यानंतर आता दागिने आवडत नसल्याचे सांगून ती निघून गेली. नंतर दागिन्यांचा सेट कमी असल्याचे आढळल्याने शोरूममध्ये एकच खळबळ उडाली.

 मालकाला आधी कर्मचाऱ्यांवर संशय येऊ लागला, मात्र जेव्हा शोरूमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचे हे संपूर्ण कृत्य कैद झाले आहे. सध्या पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *