तेलंगणाच्या राजकारणी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस.शर्मिला यांची गाडी शहर पोलिसांनी क्रेनने उचलली. हैदराबादच्या धमनी रस्त्यावर ही धक्कादायक दृश्ये दिसून.
सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख शर्मिला यांना वारंगलमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले.
या झटापटीत एका कारचे नुकसान झाले. याच कारच्या ड्रायव्हर सीटवर बसून संतप्त शर्मिला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अधिकृत निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न करत होत्या. यावेळी पोलिसांनी शर्मिला यांची कार क्रेनने ओढत बाजुला घेतली.
यावेळी कारमध्ये शर्मिला बसलेल्या होत्या. तर बाजुला माध्यमांचे प्रतिनिधी धावत होते. या धावपळीत कारचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांच्या निवस्थानाकडे निघालेल्या शर्मिला यांची कार अडवून पोलिसांनी ती कार एसआर नगर येथे नेली. दरम्यान पदयात्रेत झालेल्या वादामुळे पोलिसांनी पदयात्रेला तात्पूर्ती परवानगी नाकारली आहे.
दरम्यान वारंगल जिल्ह्यातील वायएसआर तेलंगणा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर टीआरएसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या
हल्ल्याचा निषेध करणारं निवेदन वायएसआर तेलंगणा पक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आलं आहे.






