कलीम शेख सलीम पिंजारी (वय 38 रा. निघोज) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून
बाबुलाल विश्वनाथ नवघरे (रा.अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील निघोजे येथील महिन्द्रा अँड कंपनीकडून 7 लाख रुपयांची बोलेरो MAXX Pick up City 3000 ही
गाडी 18 नोव्हेंबर रोजी तयार झालेली नवीकोरी गाडी गुजरात येथील भूजमधील शोरूमसाठी पाठवायचो होती
ती 22 नोव्हेंबर रोजी चाकण येथून निघाली, 25 नोव्हेंबर रोजी गुजरातला पोहचणे अपेक्षीत होते
मात्र अद्यापही गाडी शोरूमला गेली नसल्याने गाडीचा अपहार झाल्याचे कंपनीच्या लक्षात आले.
त्यानंतर कंपनीच्या वतीने चाकण पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






