नगर मनमाड मार्गावर दुचाकीचा मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला.
देवदर्शनासाठी पत्नी, सासू आणि भाच्यासोबत निघालेल्या तरुण शेतकऱ्याचा या अपघातात मृत्यू झालाय.
घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातानंतर नगर मनमाड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पत्नी आणि सासूच्या डोळ्यांदेखत जखमी तरुणाने जागीच प्राण सोडला.
या अपघातात मृत तरुण शेतकऱ्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तर सासू आणि भाचा यांना किरकोळ मार लागला असल्याची माहिती मिळतेय.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठ दिवसात झालेला हा तिसरा अपघात आहे.
अवघ्या आठ दिवसात झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात आतापर्यंत 5 जणांची जीव गमावलाय.





