👁 4 Views

धक्कादायक; बापानेच केला मुलीचा विनयभंग

 

मुंबईच्या चेंबूर परिसरात वडिलांनीच मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.


प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्तीवर विविध कायद्यांतर्गग गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडिलांनी अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना, तिला चुकीचा स्पर्श केला. या घटनेनंतर पीडित मुलगी ही मानसिक तणावात होती.


यातूनच मुलीने रेस्टिलच्या गोळ्या घेऊन झोपली. पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिल जवळील चंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगी शुद्धीवर आल्या डाॅक्टरांनी तिच्याजवळ विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.


त्यावेळी आरोपी बापाने तेथून पळ काढताना, डाॅक्टरांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, डाॅकटरांना धक्का मारून आरोपीने पळ काढला. 


अखेर पोलिसात गुन्हा नोंदल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी होती आणि आरोपीने त्याचा फायदा घेतला. मुलीने रेस्टिलच्या गोळ्या घातल्याने ती बेशुद्ध झाली त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


 डाॅक्टरांनी तिच्याजवळ विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *