👁 6 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “प्रोजेक्ट मॅनेजमेंट” याविषयावर व्याख्यान

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी “प्रोजेक्ट मॅनेमेंट” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


 हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली. 


   या कार्यक्रमाचे उद्घाटन सचिन बाबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे आदींच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 


  दरम्यान व्याख्याते सचिन बाबर यांचे महाविद्यालयाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन बाबर म्हणाले, आज संपूर्ण जग मोबाईल व इंटरनेट च्या साहाय्याने जोडले असताना व आपण सर्व जनांना प्रोजेक्ट मॅनेमेंट बद्दल चे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत असणे नितांत गरजेचे आहे.


 मागील काही वर्षात जगभरात अनेक टेक्निकल बदल घडल्याचा घटना आपण पाहत असतो ऐकत असतो तरीही आपण या विषयाकडे दुर्लक्ष करत आहोत परंतु येणाऱ्या काळात या विषयाची व्याप्ती वाढवायची असेल तर विशेष करून कॉम्प्युटर सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा शिकणाऱ्या विद्यार्थांना नवीन जॉबच्या संधी मिळाली पाहिजे.

  हे व्याख्यान कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील द्वितीय, तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते या कार्यशाळेत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील १५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 


या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. संदीप लिंगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *