घरच्यांकडून प्रेमविवाहाला होणाऱ्या विरोधामुळे अनेकदा जोडपी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. अशा अनेक घटना आजवर तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता एक अजब प्रकरण समोर आलं आहे.
यात एका नवरदेवाला लग्नाची इतकी घाई झाली, की लग्नाच्या आधीच तो आपल्या होणाऱ्या पत्नीला घेऊन पळून गेला. लग्नाआधी अचानक नवरी गायब झाल्याने घरात खळबळ उडाली.
नंतर लोकांना जेव्हा समजलं की ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळाली आहे, तेव्हा घरातल्यांनी सुटकेचा निश्वास घेतला.
मात्र, तोपर्यंत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. ही घटना बिहारमधील आहे. बिहारच्या राम रूद्रपूर गावातील संध्या नावाच्या मुलीचं लग्न दरियापूर ठाण्याच्या क्षेत्रातील अकबरपूर गावातील रहिवासी असलेल्या बोल बम साहनी याच्यासोबत ठरलं होतं. दोन्हीकडील कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले होते.
मात्र, लग्न पुढच्या वर्षी होणार होतं. मात्र, या दोघांचं दररोज बराच वेळ बोलणं होत असे. दोघांचंही प्रेम इतकं वाढत गेलं की त्यांना एकमेकांशिवाय आता एक क्षणही राहायचं नव्हतं. याच कारणामुळे दोघांनी एक प्लॅन बनवला आणि संध्या काही न सांगताच घरातून फरार झाली.
दोघंही एकमेकांसोबत पळून गेले.या प्रकरणी पनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून मुलीला ताब्यात घेतलं.
नंतर पोलिसांनीही दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या नातेवाईकांच्या संमतीने स्थानिक पोलिसांच्या देखरेखीखाली ठाकूरवाडी मंदिरात विवाह पार पडला.
शुक्रवारी रात्री पनापूर बाजार येथील रामजानकी मंदिरात स्थानिक पोलीस ठाण्याच्या एसआय रुपम कुमारी यांनी दोन्ही पक्षांचे नातेवाईक आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दोघांचा विवाह केला. हा अनोखा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.





