जुगाड’ ही कमी साहित्यात किंवा एखादी उणीव भरून काढण्यासाठी किंवा तडजोड करण्यासाठी उपयोगात आणली जाणारी भारतीय संकल्पना आहे. ही संकल्पना गरज भागवण्यासाठी निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओतील मुलाने कमी साहित्यात एक गाडी तयार केली आहे. या गाडीवर दोन-तीन नाही तर 6 जण एकत्र बसू शकतात.
हा व्हिडिओ पाहून महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्राही अचंबित झाले आहेत. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, ‘केवळ कमी साहित्यात केलेली ही गाडी जागतिक स्तरावरचा शोध असू शकतो. गरज हीच आविष्काराची जननी असलेल्या गावातील वाहतुकीच्या प्रयोगांनी मी नेहमीच प्रभावित असतो.’
आनंद महिंद्रा अनेक वेळा आपल्या ट्विटर हँडलवर अशा नवनवीन संकल्पना असलेल्या लोकांना ट्विटरवरून प्रोत्साहित करतात. यापूर्वी देखील अवघ्या सव्वा लाखात रिक्षेत घर बनवणा-या चेन्नईतील तरुणाला प्रोत्साहित केले होते.





