👁 5 Views

डम्पिंग ट्रॅक्टर व कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू; एक जखमी

 

उसाने भरून चाललेल्या डम्पिंग ट्रॅक्टर गाडीला कंटेनर ने पाठीमागून धडक देऊन ती पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला. 


हा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील चंद्रमौळी चौकात रात्री उशिरा झाला.

सुनील कोंडीबा लबासे वय २४ रा तालखेड ता माजलगाव जिल्हा बीड असे मृताचे नाव आहे. तर कृष्णा पिनेश क्षीरसागर वय १३ रा तालखेड असे जखमीचे नाव आहे. 


मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, डम्पिंग ट्रॅक्टर क्रमांक एम एच २६ बी ८४७८ हा उसाने भरून मोहोळ च्या दिशेने येत होता.


ती डम्पिंग ट्रॅक्टर गाडी चंद्रमौळी चौकाच्या पुढे आल्यावर, त्याच वेळी कंटेनर क्रमांक टी एस ८ युबी ९११ हा पाठीमागून भरधाव वेगाने आला. 

त्याने सदर डंपिंग ट्रॅक्टर गाडीला पाठीमागुन जोराची धडक दिली त्यात ड्रम्पिंग ट्रॅक्टर गाडी पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा क्षीरसागर हा जखमी झाला. अपघात होतास कंटेनर चालक पळून गेला. या अपघाताची फिर्याद अमर प्रभू डोंबे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *