👁 6 Views

२४ तलवारी जप्त, पोलिसांची धडक कारवाई

 

शहरातील गुरुद्वारा भागात पोलिसांनी सापळा रचून दोन तरुणांकडून 24 तलवारी जप्त केल्या असून चरणसिंग भुपिंदरसिंग आणि बाळासाहेब पवार अशी या दोघांची नाव आहे.


गुरुद्वाराजवळ लावण्यात आलेल्या एका दुकानातून तलवारी विकल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. दोन्ही आरोपी विरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपींनी तलवारी कुठून आणल्या आणि कोणासाठी आणल्या याचा पोलीस तपास करीत असल्याची माहिती डिवायएसपी समीरसिंग साळवे, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मोठ्या गुरुद्वाराजवळ एक व्यक्ती लपूनछपून तलवारी विकत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक समीर सिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद गिते, पोलीस गणेश नरोटे, गौरव गांगुर्डे, राजेन्द्र खैरनार, रणजित चव्हाण, चांदवड पोलीस स्टेशनचे पालवी, उत्तम गोसावी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला आणि तलवारी विकत असलेला


 चरणसिंग भुपिंदरसिंग (वय.27, रा. अमृतसर), त्याचा जोडीदार बाळासाहेब पवार (रा. वडगांव पंगू, ता.चांदवड) यांना अटक करून त्यांच्याकडून 90 हजार रुपये किंमतीच्या 24 तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *